![]()
ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची अभद्र युती लोकशाहीची हत्या करत आहे . देशाची लोकशाही वाचवणे हे केवळ आमचेच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर या अभद्र युतीच्याविरोधात जे लोकं मैदानात उतरतील त्यांच्यासोबत काँग्रेस पक्ष असेल, हा कोणताही राजकीय मुद्दा नसून संविधान वाचवण्याची लढाई आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले म्हणाले की, भाजप सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी आणि युवाविरोधी असून, मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना हक्काचा बोनस दिलेला नाही. एकीकडे हमीभाव मिळत नसताना दुसरीकडे महागाई वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. यामुळेच आज भाजपच्या मंत्र्यांना आणि आमदारांना बंदूकधारी सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात दौरे करावे लागत असून ते रस्त्यावरही सुरक्षित राहिलेले नाहीत, असा टोला त्यांनी भंडाऱ्यांच्या पालकमंत्र्यांना लगावला आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना पास केले जाते नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या घटनात्मक स्वायत्त संस्थेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून पेपरफुटी आणि परीक्षा रद्द होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. विद्यमान एमपीएससी अध्यक्षांची पार्श्वभूमी पाहता ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव राहिलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण भरती प्रक्रियेत थेट राजकीय हस्तक्षेप होत असून गुणवंत, हुशार मुला-मुलींना डावलून सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना पास केले जात आहे. एमपीएससीच्या प्रक्रियेत मोठी गडबड नाना पटोले म्हणाले की, एमपीएससी हा एक घटनात्मक बोर्ड आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा प्रचंड दबाव वाढल्यानंतर केवळ सचिवांची बदली करण्यात आली. हा प्रकार म्हणजे ‘ताकाची तहान ताकावर भागवण्यासारखा’ आहे. सचिवांना पदावरून हटवले याचा थेट अर्थ असा की एमपीएससीच्या संपूर्ण प्रक्रियेत मोठी गडबड झाली आहे, हे सरकारने स्वतःच मान्य केले आहे. परीक्षेत गैरप्रकार करून सरकारने राज्यातील सुशिक्षित तरुणांचा विश्वासघात केला असून त्यांच्या भविष्याशी खेळ चालवला आहे. राज्य सरकारने या गोंधळाबद्दल जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि भविष्यात असा घोळ होणार नाही याची लेखी हमी दिली पाहिजे. हे ही वृत्त वाचा नागपूर-वर्धा मार्गावर भीषण अपघात:भरधाव ट्रेलरच्या धडकेत आई-वडीलांसह 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, एक चिमुकला गंभीर
नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गवसी-मानापूर गावाजवळ एका भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या अपघातात पती, पत्नी आणि त्यांच्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चालकाचा शोध घेतला जात आहे. वाचा सविस्तर
Source link
मोदी-भाजप अन् निवडणूक आयोगाची अभद्र युती लोकशाहीची हत्या करतेय:देशाची लोकशाही वाचवणे हे प्रत्येकाचे दायित्व- नाना पटोले