Headlines

ज्ञानेशकुमार यांनाच नव्हे तर पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांनाही जावे लागेल:देशात भयंकर वणवा पेटण्याची शक्यता-संजय राऊत




निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची ही केवळ एक सुरुवात असून, 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर एक भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. ज्ञानेशकुमार हे एकटेच नसून देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही जावे लागेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. देश सध्या खदखदत असून, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तरुणांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, अंधभक्तांनी धर्मांधतेचे कितीही डमरू वाजवले, तरी जनतेच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न पूर्णपणे वेगळे आहेत. अंधभक्तांची पिढी आता मागे पडली असून, देशातील नव्या पिढीला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची सत्ता नकोशी झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी आमच्याविरोधात ज्या भाषेत टीका केली, त्याच भाषेत आता तरुण त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. भाजपने आम्हाला भाषेचे मार्गदर्शन करावे, अशी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. पूर्णेकर मृत्यू प्रकरणी शिंदेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा संजय राऊत म्हणाले की, पूर्णेकरांचा मृत्यू आंदोलनात झालेला नाही, त्यामुळे त्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जर भयमुक्त ठाणे व्हावे यासाठी जनता मोर्चा काढत असेल, तर हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे अपयश आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांची माफी मागितली पाहिजे, कारण ते गुंडांना पोसणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा देत आहेत. गणेश नाईक यांनी या ‘भयमुक्त ठाणे’ आंदोलनाचे नेतृत्व केले पाहिजे. ज्ञानेशकुमारांनी राजीनामा द्यावा संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगातील घोटाळे, कोट्यवधी मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवणे आणि निवडणूक हायजॅक करण्याचे काम करणाऱ्या भाजपचे एजंट ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी हा लढा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पुढाकारातून निघणाऱ्या या मोर्च्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), डावे पक्ष आणि इतर सर्व घटक पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा झाली असून, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. उद्या दिल्लीतील मोर्चात सहभागी होणार संजय राऊत म्हणाले की, आजचा मोर्चा संपल्यानंतर उद्या दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मोर्चासाठी आपण दिल्लीला रवाना होणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन पाहता, आदित्य ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे आपण स्वतः पुण्यात जाऊन आंदोलनकर्त्य विद्यार्थ्यांची भेट घेणार आहोत. याविषयी आमदार रोहित पवार यांच्याशीही आपली सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी शेवटी दिली. हे ही वृत्त वाचा निवडणूक आयोगाविरोधातील ठाकरेंच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा:मोदी-भाजप अन् निवडणूक आयोगाची अभद्र युती लोकशाहीची हत्या करतेय- नाना पटोले
ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची अभद्र युती लोकशाहीची हत्या करत आहे . देशाची लोकशाही वाचवणे हे केवळ आमचेच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर या अभद्र युतीच्याविरोधात जे लोकं मैदानात उतरतील त्यांच्यासोबत काँग्रेस पक्ष असेल, हा कोणताही राजकीय मुद्दा नसून संविधान वाचवण्याची लढाई आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *