![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढण्यात आलेला मोर्चा हा केवळ स्वतःचे दुकान वाचवण्यासाठी काढण्यात आलेला मोर्चा आहे. यांच्याकडे कोणत्याही महापालिकेची सत्ता नाही आणि कुठेही ही लोकं निवडून आलेले नाहीत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला दाग लावण्याचे काम ठाकरे बंधूंकडून केले जात असून, या आंदोलनाला ‘तुकडे-तुकडे गँग’ जमा होईल, असे भाजप आमदार परिणय फुके यांनी म्हटले आहे. आमदार परिणय फुके म्हणाले की, राज ठाकरेंचे स्वतःचे काहीच कर्तृत्व उरले नाही आणि मुंबईबाहेर जाऊन एखादे आंदोलन करतील एवढी त्यांची ताकदच राहिलेली नाही. त्यामुळेच दुसऱ्यांच्या आंदोलनात फोटो काढून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. तोंडाच्या वाफाऱ्यानेच त्यांची ‘इंजिन’गाडी सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.
याच्याच मागणीनुसार ‘एसआयआर’ मोहीम आमदार परिणय फुके म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस, उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन करत निवडणूक आयोगावर दबाव टाकला आणि मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला. मतदारयाद्यांमध्ये अनेक लोकांची नावे चुकली आहेत, मृत व्यक्तींची नावे आहेत आणि स्थलांतरित झालेल्यांची नावे अजूनही कायम आहेत, ही बाब राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती. याच लोकांच्या मागणीनुसार निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’ मोहीम सुरू केली.त्यावेळी निवडणूक आयोगाने प्रत्येक पक्षाला विनंती केली होती की, त्यांनी आपले बूथ लेव्हल अधिकारी नियुक्त करावेत आणि या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. परंतु, ना मनसेने आणि ना उबाठाने यात सहभाग घेतला, कारण त्यांच्याकडे काम करण्यासाठी पुरेशी संघटनाच उरलेली नाही. विधानसभेला त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही; जर त्यांचा प्रतिनिधी असता, तर हा संभ्रम त्यांच्या मनात निर्माणच झाला नसता, असे फुके यांनी स्पष्ट केले. रविवारी पिकनिकला निघाल्यासारखे मोर्चे काढतात आमदार परिणय फुके म्हणाले की, एसआयआरची प्रक्रिया सुरू असताना हे सर्वजण झोपले होते आणि आता ही पूर्ण प्रक्रिया झाल्यावर त्यांना जाग आली आहे, असे म्हणत परिणय फुके यांनी, हे लोक आठवड्यातील सहा दिवस झोपा काढतात आणि रविवारी उठून पिकनिकला निघाल्यासारखे असे मोर्चे काढतात, असा उपरोधिक टोला लगावला आहे.
Source link
ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे स्वतःचे दुकान वाचवण्याचा प्रयत्न:एसआयआर प्रक्रियेवेळी उबाठा अन् मनसे झोपले होते का?- आमदार परिणय फुके