![]()
संजय राऊत यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यापूर्वी आपण स्वतः किती विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली, याचा हिशोब महाराष्ट्रातील जनतेला दिला पाहिजे. रोहित पवार पुण्यात बसून जी नौटंकी करत आहेत, ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी असून त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेत एकाही गरीब विद्यार्थ्याला मोफत शिकवले नाही किंवा त्यांची फी माफ केली नाही, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. राऊत गेले 25 वर्षे खासदार असून त्यांनी संसदेत विद्यार्थ्यांचा एकही प्रश्न कधीही मांडलेला नाही, अशी टीका त्यांनी केली. नवनाथ बन म्हणाले की, परबांना भाजपला विचारधारेवर उत्तर देता आले नाही, म्हणून ते वैयक्तिक टीका करत आहेत. मात्र, कोण ‘मातोश्री’चे गुलाम आणि पगारी नोकर आहे, हे परबांनी एकदा आरशासमोर उभे राहून पाहिले पाहिजे. एकेकाळी ‘मातोश्री’वर वडापाव आणून देण्याची जबाबदारी अनिल परब यांच्यावर होती, तर मला जनतेने थेट निवडून दिले आहे. त्यांच्याकडे चर्चेसाठी कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत, त्यामुळेच ते अशा वैयक्तिक पातळीवर घसरतात, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा नवनाथ बन म्हणाले की, राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत; मात्र उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या नादी लागून ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यांना जर खरोखरच मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर त्यांनी प्रखर हिंदुत्वाची जी मूळ भूमिका घेतली होती, त्यावर पुन्हा चालले पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर त्यांनी प्रामाणिकपणे स्वीकारले, तर ते निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतात. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंना तर आता संपूर्ण जगाचे एकत्रित अध्यक्षपद दिले पाहिजे, इतके महान काम त्यांनी केले आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. ठाकरेंचा ‘गजकरण मोर्चा’ नवनाथ बन म्हणाले की, हा कोणताही गर्जना मोर्चा नसून हा ‘गजकरण मोर्चा’ आहे. मोर्चा काढण्यापूर्वी आधी स्वतःची संघटना बांधावी आणि बीएलओ (BLO) नियुक्त करावेत. ज्यांना स्वतःचे खासदार टिकवता येत नाहीत, त्यांनी निवडणूक आयोगावर खापर फोडू नये. महाराष्ट्रात जनतेने लोकसभेला महाविकास आघाडीला खासदार दिले, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले होते; मात्र त्यापैकी 6 खासदार सोडून निघून गेले, त्याला काय निवडणूक आयोग किंवा ज्ञानेश कुमार जबाबदार आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. अमित ठाकरेंचा पराभव कोणी केला? नवनाथ बन म्हणाले की, निवडणुकीत अमित ठाकरे यांचा पराभव नेमका कुणी केला? तो उबाठा गटाने केला असून, तिथे महेश सावंत निवडून आले आहेत. ते काय भाजपचे नव्हते, तर उबाठा गटाचेच होते. मग अमित ठाकरे आणि मनसेची भूमिका महेश सावंत यांच्या विरोधात आहे का? कारण महेश सावंत याच निवडणूक प्रक्रियेतून आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच निवडून आले आहेत. जर महेश सावंत यांची निवडणूक योग्य असेल, तर मग त्याच प्रक्रियेतून जिंकलेल्यांविरोधात अमित ठाकरे आणि मनसे गर्जना कशी करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे ही वृत्त वाचा ज्ञानेशकुमार यांनाच नव्हे तर पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांनाही जावे लागेल:देशात भयंकर वणवा पेटण्याची शक्यता-संजय राऊत
निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची ही केवळ एक सुरुवात असून, 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर एक भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. ज्ञानेशकुमार हे एकटेच नसून देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही जावे लागेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. देश सध्या खदखदत असून, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तरुणांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. वाचा सविस्तर
Source link