![]()
मानवी जीवनातील सर्व समस्यांचा व प्रश्नांचा जर खरोखर निचरा करायचा असेल तर चांगल्या विचारांचे विचारविनिमय हाच एकमेव आधार आहे. या विचारांचा’ मागोवा घेत घेत जगल्यास जीवन समस्यामुक्त होईल. मात्र आजकाल समस्या सोडवण्याचा सर्वात प्रभावी उपाय आंदोलन झाला आहे. आंदोलनाची ही मानसिकता समाजाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे समाज आणि देशाला पुढे नेण्यासाठी आंदोलनाचा नव्हे, तर चांगल्या विचारांचा मार्ग स्वीकारणे आणि लोकांना विचार करायला शिकवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अयोध्येच्या श्रीराम मंदिर न्यासाचे महासचिव स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले. अहिल्यानगर विचार भारती, बन्सीमहाराज व चंद्रा एजन्सीज यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या गणेशोत्सव उत्कृष्ट आरास स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर ज्योती गाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, उद्योजक पेमराज बोथरा, उद्योजक राजकुमार जोशी, हेमंत नेवासकर, मिलिंद नेवासकर, विचार भातीचे अध्यक्ष सुधीर लांडगे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रवींद्र बारस्कर यांनी स्पर्धेची भूमिका विशद केली. राहुल जामगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. विचार भारतीचे अध्यक्ष सुधीर लांडगे, सचिव मनोज झंवर, कार्याध्यक्ष राजेश झंवर, किशोर कटोरे, भरत ठुबे, संपत नलावडे, सुनील नागोरी, अमित खामकर, महेंद्र जाखेटे, प्रशांत आढाव, विशारद पेटकर, डॉ. निळकंठ ठाकरे आदींनी पाहुण्यांचे तसेच परीक्षकांचे सत्कार केले. अभिनेते मोहिनीराज गटणे यांनी सूत्रसंचालन केले. अनिकेत कौर यांनी आभार मानले. यावेळी नगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
Source link
चांगल्या विचारांच्या मार्गानेच होईल समाजाची प्रगती- स्वामी गोविंददेवगिरी:गणेशोत्सव उत्कृष्टआरास स्पर्धेचे जल्लोषातपारितोषिक वितरण