![]()
सत्य, अहिंसा आणि मानवतेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यातून निष्काम राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते. म्हणूनच त्यांचे विचार आजही तितकेच जिवंत आणि मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले. स्थानिक महात्मा गांधी विचार-मंचाच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्मारक, शिवाजी चौक, अकोट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सत्यपाल महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मध्यस्थी’चे महासचिव सुरेशदादा कराळे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, प्राचार्य गजाननराव चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आत्मनिर्भरता, स्वावलंबन, स्वदेशीचा संदेश देणाऱ्या चरख्यावरील सूत कताई उपक्रमात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दुपारच्या सत्रात श्री क्षेत्र श्रद्धा सागर येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवैष्णवांना चरख्यातून सूत कताईचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राम मूर्ती वालसिंगे यांनी केले. रामदास होपळ यांनी आभार मानले. जयंती सोहळ्याला नंदकिशोर हिंगणकर, प्रा. वाल्मीक भगत, मीराताई कोरपे, लताताई चिकटे, वृंदाताई मंगळे, ज्योतीताई कुकडे, शोभाताई म्हैसने, बाळासाहेब फोकमारे, दिलीप हरणे, प्रा. गजानन हिंगणकर, अजाबराव मोकळकर, बंडू पाटील कुलट, सुरेश शिंगनारे, नंदकिशोर जांबुळकर, विजय वानखडे, संजय वालसिंगे, डी. ओ. म्हैसणे, नागोराव वानखडे, गजानन महल्ले, विनायकराव कुकडे, प्रदीप ओळंबे, अनिल कोरपे व कार्यकर्ते उपस्थित होते. वर्षभर सूत कताई प्रा. संदीप बोबडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी झाला. केवळ एका दिवस स्वच्छतेपुरते न थांबता, दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी शिवाजी चौक परिसरात श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवण्याचा तसेच चरख्यातून सूत कताईचा उपक्रम वर्षभर निरंतर चालवण्याचा संकल्प करण्यात आला.
Source link
गांधीजींच्या विचारांमधून निष्काम राष्ट्रभक्तीची प्रेरणा- सत्यपाल महाराज:अकोट येथे महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्त विविध उपक्रम; मान्यवरांचा सहभाग