Headlines

मोहोळ तालुक्यातील जि. प. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधी मंजूर:आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश




मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांची झालेली दुरावस्था दूर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजू खरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतदारसंघातील शाळांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राजू खरे यांनी मागील पंधरा दिवसांत शिक्षणमंत्र्यांची ही दुसरी भेट घेऊन हा निधी मंजूर करून घेतला आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शाळांची खालावत चाललेली इमारत, वर्गखोल्यांची टंचाई आणि अपुऱ्या सुविधा ही संपूर्ण वस्तुस्थिती आमदार राजू खरे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मतदारसंघातील शाळांच्या आधुनिकीकरणासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी तातडीने मोठा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. त्यांच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात खालील शाळांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, कोन्हेरी व जिल्हा परिषद शाळा, फुलचिंचोली या दोन प्रमुख शाळांसोबतच मतदारसंघातील इतर अनेक जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी अधिकचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री भुसे यांनी दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरांप्रमाणेच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळावे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक शाळेचा कायापालट करण्यासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास आमदार खरे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, स्पर्धात्मक शिक्षण मिळावे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *