Headlines

यवतमाळमधील अडान नदीच्या पुरात कार वाहून गेली:आईसह 2 मुली बेपत्ता, झाडाच्या आधारे पती बचावला; युद्धपातळीवर शोध सुरू




यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दहेली येथे अडान नदीवरील पुलावरून जात असताना पुराच्या प्रवाहात इर्टिगा कार वाहून गेल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका महिलेसह दोन मुली बेपत्ता झाल्या असून, पतीने झाडाचा आधार घेत थरारक बचाव केला. प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. आईसह दोन मुली बेपत्ता ही घटना शुक्रवार (दि. ३१ जुलै) रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास दारव्हा तालुक्यातील दहेली येथे घडली. या घटनेत वाहनातील पती अविनाश खंदारे यांनी प्रसंगावधान राखत वाहनाचा दरवाज्याच्या काच उघडून बाहेर पडत झाडाचा आधार घेत आपला जीव वाचवला, तर त्यांची पत्नी व दोन्ही मुली पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अविनाश खंदारे हे कुटुंबासह इर्टिगा वाहनातून दारव्हा येथून आपल्या गावी परतत होते. दरम्यान, दहेली येथील अडान नदीवरील पुलावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना,अंदाज न आल्याने वाहन पुलाच्या काठावर येऊन बंद पडले. मात्र, पुराच्या वेगवान प्रवाहामुळे वाहन पलटी होऊन ते थेट नदीत वाहून गेले. शोधमोहीम सुरू या दुर्घटनेत माधवी अविनाश खंदारे, तेजू अविनाश खंदारे आणि प्रांजली अविनाश खंदारे या तिघी बेपत्ता झाल्या असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पाऊस आणि नदीतील वाढलेला प्रवाह यामुळे बचावकार्याला अडथळे निर्माण होत असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा.. भिवंडीत चार मजली इमारत कोसळली:3 जणांचा मृत्यू, 4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू भिवंडीमध्ये गुरुवारी मध्यरात्री एक चार मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, ५ ते ६ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.
पावसाचा धुमाकूळ:नाशिक घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट, संभाजीनगरला यलो अलर्ट; जळगाव-विदर्भातही मुसळधारेचा इशारा राज्यात सलग ८ व्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात २४ तासात २७.६, जळगावात ४० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात तसेच नाशिकमध्ये रिमझिम सुरू होती. मुसळधार पावसामुळे विदर्भ जलमय झाला असून गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यातील उमरी बाजार मंडळात (ता. किनवट) अतिवृष्टी झाली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *