Headlines

योगा अभ्यासातून निरोगी जीवनाचा संकल्प करावा:ठाणेदार सुरेश म्हस्के यांचे प्रतिपादन, विविध योगासनांचा सराव करुन घेतला‎




धावपळीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता व सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी असून नियमित योगाभ्यासातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे प्रतिपादन परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भारवी कला अकादमी, जय गजानन योगा ग्रुप व वाघामाता योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी प्राचार्य रा. भ. महाजन, भारवी कला अकादमीचे अध्यक्ष अशोक बोंडे, तालुका पुरवठा निरीक्षक राहुल केदारे, अचलपूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र यावले, रोटरी क्लबचे अध्यक्ष गौरव बंसल, योगशिक्षक रवींद्र सावरकर आदी मान्यवर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रा. भ. महाजन यांनी आपल्या मनोगतात भारतीय परंपरेतील योगशास्त्र हे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. अशोक बोंडे, ॲड. धर्मेंद्र यावले, गौरव बंसल व दिलीपकुमार बोबडे यांनीही योगाचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार व्यक्त केले. योग शिक्षक अनिल सेवळकर यांनी विविध योगासनांचा सराव करून घेतला. विष्णुपंत गुरव यांनी गाणे, प्रात्यक्षिके आणि उंच काठ्यांवर चालण्याच्या खेळातून आरोग्य संतुलनाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. यावेळी राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त पत्रकार राज इंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच खुल्या राष्ट्रीय योग स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक मिळविणाऱ्या वीर नंदनवार या चिमुकल्याचाही विशेष गौरव करण्यात आला. त्याने सादर केलेल्या योग प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे संचालन पंजाबराव चौधरी व बाळासाहेब खडके यांनी केले, तर आभार गजानन रोडगे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने योगप्रेमी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *