Headlines

मोर्शीत महेशनवमीच्या पर्वावर विविध लोकोपयोगी कार्यक्रम:जपाली हनुमान मंदिर येथे 108 वेळा ओंकाराचा करण्यात आला जप‎




मोर्शी तालुका माहेश्वरी मंडळाद्वारे महेश नवमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित विशेष कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात पार पडला. पहिल्या दिवशी शनिवारी डॉ.भरत राठी यांचे दवाखान्यात बीपी,शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊ वाजता जपाली हनुमान मंदिर येथे १०८ वेळा ओंकाराचा जप व सामूहिक हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमात सर्व माहेश्वरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, तर दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुहूर्तावर गुरुदेव सेवा मंडळ सभागृह, हनुमान नगर येथे योग प्रशिक्षक डॉ. शितल यश मंत्री यांनी योग व प्राणायामाचे महत्त्व व स्वास्थ्यसंबंधी लाभ यावर मार्गदर्शन केले. योगामुळे स्वस्थ जीवन, शांत मन व सकारात्मक जीवनशैली आत्मसात करण्याकरिता योगाभ्यास व प्राणायाम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आज, सोमवार, २२ रोजी महेशनवमीच्या पर्वावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महेश नवमीच्या शुभ पर्वाला यशस्वी करण्यासाठी मोर्शी तालुका माहेश्वरी मंडळाचे नंदकिशोर गांधी, नंदकिशोर मंत्री, विजय तापडिया, शरद भैय्या, चेतन मंत्री, मनीष बंग, डॉ. श्याम राठी, उमेश मंत्री, राजू राठी, सागर राठी, सुधीर झंवर, डॉ. सुमित राठी, सुनील राठी, श्रीकिसन राठी, संजय भैय्या, प्रेम मंत्री, विनय साबू, निलेश राठी, गोपाल मंत्री, उमेश गांधी, रमेशचंद्र बंग, प्रा.जयकुमार गट्टानी, प्रमोद राठी, विपुल राठी, अजय साबू इत्यादी माहेश्वरी समाजाचे युवक अथक परिश्रम घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *