![]()
मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा स्टेशन रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. रशियन ग्रँड मास्टर पेट्र किरियाकोव आणि जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिर
.
अहिल्यानगरच्या क्रीडा इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावर फिडे रेटिंग स्पर्धा होत असल्याने क्रीडा वर्तुळात उत्साह आहे. स्पर्धेबाबत माहिती देताना अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले, या आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेत गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू आणि महाराष्ट्र यांसह देशाच्या विविध राज्यांतून २७५ पेक्षा अधिक नामांकित बुद्धीबळपटूंनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये १४० आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेटिंग असलेले खेळाडू आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेत अवघ्या साडेपाच वर्षांच्या बाल बुद्धिबळपटूपासून ते ९२ वर्षांच्या ज्येष्ठ खेळाडूपर्यंतचे स्पर्धक आपले बुद्धिचातुर्य पणाला लावणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून प्रवीण ठाकरे, पवन राठी, शिरीष इंदुरकर, शार्दुल तपासे, अमरीश जोशी, देवेंद्र ढोकळे, प्रशांत धंगेकर आणि विशाल गुजराती काम पाहत आहेत.
उद्घाटन प्रसंगी सचिव यशवंत बापट, सुबोध ठोंबरे, पारूनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी उपस्थित होते. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खजिनदार सुबोध ठोंबरे, शाम कांबळे, मनीष जस्वानी, चेतन कड, संजय खडके, नवनीत कोठारी, डॉ. स्मिता वाघ, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर, दत्ता घाडगे, स्वप्नील भगुरकर आदी संयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत. सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी, तर आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.यंदा रशियन ग्रँड मास्टर यांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, त्याचा स्थानिक खेळाडूंना मोठा फायदा होईल.
प्रथमच १०० लाकडी बुद्धिबळ पटांचा वापर या स्पर्धेचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, डिजिटल प्लॅस्टिक बोर्डच्या जमान्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे १०० अस्सल लाकडी बुद्धिबळ पट आणि सोंगट्यांचा वापर महाराष्ट्रात पहिल्यांदाच या स्पर्धेत केला जात आहे. तसेच बुद्धिबळाचा प्रसार वाढवण्यासाठी संघटनेच्या वतीने १०० चेस बोर्ड खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.