Headlines

राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह:राजकीय नेत्यांच्या घरीही लगबग, सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी; पाहा फोटोज




राज्यभरात आज बहीण-भावाच्या अतुट प्रेमाचा आणि विश्वासाचा सण असलेला ‘रक्षाबंधन’ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि रक्षणाची प्रार्थना करते. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत घराघरांत या सणाचा गोडवा पाहायला मिळत असून, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही रक्षाबंधनाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी रक्षाबंधन साजरे केले असून त्याचे खास फोटो त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. सुषमा अंधारेंनी बांधली उद्धव ठाकरेंना राखी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना राखी बांधली. या खास क्षणाचे फोटो समोर आले असून, राजकीय धकाधकीच्या पलीकडे जाऊन जपलेला बहीण-भावाच्या नात्याचा एक हळवा कोपरा यातून पाहायला मिळाला. चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांचे रक्षाबंधन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. त्यांनी भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांना राखी बांधली. राजकीय व्यासपीठावर एकत्र काम करत असतानाच या दोघांमधील बहीण-भावाचे स्नेहाचे आणि विश्वासाचे नाते या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पंकजा मुंडे, आदिती तटकरेंनी बांधली धनंजय मुंडेंना राखी मुंबईत धनंजय मुंडे यांना मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री अदिती तटकरे यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी आणि जनतेची सदैव सेवा घडावी, अशा शुभेच्छा दिल्या. अजितदादांच्या आठवणीत सुळे-पवार भावुक दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने खासदार सुप्रिया सुळे भावुक झाल्या आहेत. दादांशिवाय साजरी होत असलेली ही राखीपौर्णिमा त्यांच्यासाठी अस्वस्थ करणारी ठरली. याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनीही भावनिक होत, “तू ज्यांना जगण्याचा आधार आणि लढण्याची उमेद दिली, त्या हजारो बहिणी आज कोणाला राख्या बांधणार दादा?” असा सवाल उपस्थित करत दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *