Headlines

राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे- देवेंद्र फडणवीस:माउली व तुकोबांच्या पालख्यांचे घेतले दर्शन




आज माउलींच्या पादुकाचे दर्शन घेतले तो भाग्याचा योग आहे. वारकरी हे माउलींचे जिवंत स्वरूप असून वारकरी एकत्र स्वरूपात माउलींच्या रूपात पाहायला मिळतात. त्यांचे सान्निध्य मिळाल्यामुळे मी आज खूप आनंदित आहे, असे उद््गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारी पालखी मार्गावरील टप्पा येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. याचबरोबर वारकऱ्यांसोबत काही वेळ पायी चालले. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माउलींकडे काही मागावे लागत नाही. माउली आपल्या मनामध्ये आहेत. पण दरवेळी माउलींकडे एकच मागणे असते, पाऊस चांगला पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे. आषाढी यात्रेबाबत सरकार एआयच्या माध्यमातून किती वारकरी येतात त्याचा अंदाज घेत आहे. या वर्षीची विक्रमी वारी असून वारकरी मागील सर्व रेकॉर्ड तोडून उपस्थिती लावतील. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागील दोन वर्षांपासून वारीचे स्वरूप बदलून टाकले आहे. जर्मन हँगर, स्वच्छता, पाद्यसेवा यामुळे वारीत नवीन वातावरण तयार झाले आहे याचा मला आनंद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *