![]()
महाराष्ट्रभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून मुंबई, ठाणे आणि कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. शाळांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसाचा धोका ओळखून पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. रायगडमधील सर्वाधिक फटका बसलेल्या ७ तालुक्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई, पुणे आणि घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट मुंबईतील हिंदमाता, चेंबूरच्या सुभाषनगरसह अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पालिकेने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. मुंबईत मुसळधार पावसाचा परिणाम; दादर स्थानकावरील रेल्वे रुळ पाण्याखाली मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता रेल्वे वाहतुकीवरही दिसू लागला आहे. दादर रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, मुंबईतील अनेक सखल भागांतही पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुर दादर हिंदू कॉलनीत पाणी साचल्याने वाहतूक संथ मुंबईतील मुसळधार पावसामुळे दादरमधील हिंदू कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गटारांची झाकणे (मॅनहोल) उघडून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यास सुरुवात केली. प्रशासनाकडून पाणी लवकरात लवकर कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. ‘रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल’; दादरमधील नागरिकांची प्रशासनाकडे नाराजी मुंबईतील मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदू कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली. नाशिक आणि नवी मुंबईची स्थिती नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी सध्या ‘यलो अलर्ट’ असून, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. ४ जुलैपासून नाशिकमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. नवी मुंबईतील जुईनगर, बेलापूर, पनवेल भागात पाऊस सुरू असून कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसांच्या संततधारेनंतर सध्या रिमझिम सुरू आहे. संभाजीनगरला आज-उद्या सलग 2 दिवस पावसाचा यलो अलर्ट एल निनोमुळे यंदा महाराष्ट्रात 8 जून रोजी मान्सून कोकणातील हर्णे व सोलापूरजवळ अडकला होता. 15 जूनपर्यंत राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यानंतर 16 दिवसांनी मान्सूनने पुनरागमन केले. गेल्या 25 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्या मार्गी लागू शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 ते 7 जुलै कालावधीत मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार तर मराठवाड्यात 2, 3 जुलैला बहुतांश ठिकाणी पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगरात 2, 3 जुलैला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे आहेत. छत्रपती संभाजीनगरात बुधवारी 3 तासांत 38.6 मिमी पाऊस झाला. हा या मोसमातील सर्वाधिक होता. दरम्यान, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील पिंपळगाव खुटे शिवारात वीज कोसळून बिहार राज्यातील लड्डू मनाई मांझी (26) या मजुराचा मृत्यू झाला, तर आडगावच्या (ता. जिंतूर) मंगलबाई खंडागळे या महिलेचा मृतदेह औंढा तालुक्यात घटनास्थळापासून 6 किलोमीटर अंतरावर आढळला. मराठवाड्याचा समावेश नाही 2 जुलैला पालघर व 3, 5 जुलैला रायगड, 5 जुलैला ठाणे, 5 जुलै सातारा, पुणे 2, 3, 5 जुलैला रेड अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, अमरावती,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीला 2 ते 5 जुलै ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालजवळ चक्रीय वारे गेल्या काही दिवसांपासून अडकलेला नैऋत्य मोसमी पाऊस वेगाने पुढे सरकला आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली. यामुळे महाराष्ट्रात पाऊस होत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पिकांच्या वाढीसाठी कमी काळ मिळाला, उत्पादनावर परिणाम होऊ शकतो जून महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक भागात पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे मूग, उडीद या पिकांचा हंगाम हातातून गेला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामळे त्याऐवजी बाजरी, सूर्यफूल किंवा चारा पिकांकडे शेतकरी वळतील. पेरण्या लांबल्याने पिकांच्या वाढीसाठी कमी कालावधी मिळतो. त्यामुळे उत्पादनावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. उत्पादन घटू शकते. म्हणून जास्त कालावधीत येणारी कपाशी तसेच सोयाबीनचे वाण शेतकऱ्यांनी टाळावे. बी. पी. लोंढे, निवृत्त कृषी अधिकारी नाशिकला पावसात डोक्यावर इरलं घेऊन वारकरी मार्गस्थ नाशिक | त्र्यंबकेश्वरहून 29 जूनला निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी वारकरी व दिंड्यांसह बुधवारी पंढरपूरकडे रवाना झाली. तेव्हा बुधवारी दुपारनंतर हलका पाऊस आल्याने डोक्यावर इरलं घेऊन हे वारकरी पावसापासून बचाव करत मार्गस्थ झाले. संबंधित बातमी वाचा.. MP-UP महाराष्ट्रात पावसामुळे रस्ते पाण्याखाली:कार-बाईक वाहून गेल्या, GRP पोलीस ठाण्यात पाणी शिरले; बिहार-झारखंडमध्ये वीज पडून 5 मृत्यू
मध्य प्रदेशातील 7 जिल्ह्यांत बुधवारी जोरदार पाऊस झाला. इंदूरमध्ये पावसामुळे एक कार नाल्यात पडली. सिहोर जिल्ह्यात रस्त्यांवर पाणी नदीसारखे वाहू लागले. यात बाईकही वाहून गेल्या. बिहारमध्ये वीज पडून तीन आणि झारखंडमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. यूपीमधील 25 शहरांमध्ये बुधवारी पाऊस झाला. आझमगड, बिजनौर, मिर्झापूरमध्ये जोरदार पावसानंतर रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. ललितपूर रेल्वे स्थानकाच्या वेटिंग हॉलमध्ये आणि जीआरपी पोलीस ठाण्यात पाणी शिरले. फतेहपूरमध्ये वादळामुळे ई-रिक्षा उलटली. सविस्तर वाचा
Source link
राज्यात पावसाचा हाहाकार:रायगड-पालघरमधील शाळांना सुट्टी; पुढील 8 तासांसाठी रेड अलर्ट, मुंबईत लोकल वाहतूक खोळंबली