Headlines

शेलापूर येथे पोलिओ मोहीम उत्साहात‎:शून्य ते पाच वर्षांतील बालकांना दिले पोलिओचे दोन थेंब,महिलाचा पुढाकार




प्रतिनिधी | मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर, शेलापूर बु.च्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात आणि यशस्वीरीत्या राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व पात्र बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला. जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश जाधव यांच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंप्री गवळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत चिंचोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी आरोग्य सहाय्यक व्यवहारे, बंड तसेच आरोग्य निरीक्षक गीता पांडे उपस्थित होत्या. मोहिमेसाठी शेलापूर बु., शेलापूर खुर्द, घुस्सर बु., घुस्सर खुर्द आणि बसस्थानक परिसरात लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. याशिवाय वीटभट्ट्या, दुर्गम व वंचित वस्त्यांमधील बालकांपर्यंत लसीकरण पोहोचावे यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबविली. यावेळी डॉ. अनिकेत चिंचोले यांनी पालकांनी प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत आपल्या पाच वर्षांखालील मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब आवर्जून पाजावेत, असे आवाहन केले. नागरिकांनीही मोठ्या प्रतिसादासह आपल्या पाल्यांना लसीकरण केंद्रांवर आणून मोहिमेत सहभाग नोंदवला. मोहीम यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. माया कऱ्हाडकर, राणी सपकाळ, अश्विन चव्हाण, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात डोस पाजताना तज्ज्ञ मंडळी व उपस्थित इतर मान्यवर. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत केवळ लसीकरण केंद्रांवरच नव्हे, तर वीटभट्ट्या, दुर्गम व वंचित वस्त्यांपर्यंत आरोग्य विभागाचे पथक पोहोचले. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांनी घरोघरी भेटी देत पालकांना जनजागृती केली आणि पात्र बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजले. लोकाभिमुख कामामुळे आयुष्मान आरोग्य मंदिर, शेलापूर बु. अंतर्गत मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *