Headlines

महिलेवर दुष्कर्म:भोंदू मनोहर मामावर गुन्हा, गुन्ह्यांच्या तपासासाठी 5 अधिकाऱ्यांची एसआयटी




करमाळा येथील भोंदूबाबा मनोहर मामाने २ दिवसांपूर्वी एका महिलेला अमावास्येच्या दिवशी आजारपण दूर करण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नव्याने समोर आली. भोंदूबाबाविरोधात सहा गुन्हे दाखल झाले असून या सहाही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ५ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. संबंधित महिलेचे आजारपण दूर करतो, अमावास्येला तीन पूजा कराव्या लागतील, असे भोंदूबाबाने सांगितले होते. सदर महिला अमावास्येच्या दिवशी पूजा करण्यासाठी आली असताना मामाने लैंगिक अत्याचार केले. संबंधित आश्रम हा अनधिकृत असल्यामुळे सील करण्यात आला असून तपासासाठी एसआयटी स्थापन केल्याचे ते म्हणाले. भोंदूच्या निकटवर्तीयांच्या २० खात्यांतून २ कोटींची उलाढाल : पुणे, गाणगापूर, कोल्हापूर येथील आश्रमांचा तपास एसआयटी पथकाकडून केला जात आहे. भोंदूबाबासह त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या २० बँक खात्यांची चौकशी सध्या सुरू आहे. या संशयित बँक खात्यांमधून सुमारे दोन कोटींहून अधिक रकमेचा व्यवहार झाल्याचे पुढे आले आहे. करमाळा येथे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. संबंधित महिलेस बेशुद्ध करून अत्याचार मनोहर भोसले याची भेट घेण्यासाठी ११ हजार रुपयांची पावती केली. तेथे पांढऱ्या रंगाची पावडर देऊन आजारी व्यक्तीला पाण्यात किंवा जेवणातून देण्यास सांगितले. उपचार व धार्मिक विधीच्या नावाखाली प्रत्येक अमावास्येला बोलावून एकूण १ लाख ६४ हजार रुपयांची रक्कम घेतली.‘पुढील अमावास्येला सर्व भक्त गेल्यानंतर रात्री उशिरा या,” असे आरोपीने सांगितले होते. मंत्रोच्चार करून शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. नकार दिल्यानंतर एका ग्लासमधून पाणी पिण्यास दिले. पाणी पिल्यानंतर बेशुद्ध झाल्यानंतर शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडिताने केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *