Headlines

राज्यात 14.8 लाख मोकाट कुत्रे; मुंबईत 3निवारा केंद्रे उभारू- सामंत:लहान मुलांच्या मृत्यूबद्दल आमदारांचा तीव्र संताप, अधिक कारवाईची मागणी




राज्यात सातत्याने वाढणारा मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आणि त्यांच्या हल्ल्यात निष्पाप बालकांना गमवावा लागणारा जीव, या गंभीर मुद्द्यावरून शुक्रवारी विधानसभेत आमदारांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने कडक पावले उचलावीत तसेच श्वान नियंत्रण मोहिमेत प्राणीप्रेमाच्या नावाखाली अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. या संदर्भातील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वस्तुस्थितीदर्शक आकडेवारी सभागृहासमोर ठेवली. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे १४ लाख ८० हजार मोकाट कुत्रे असून एकट्या मुंबईत ही संख्या ९४ हजारांच्या घरात आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारकडून निर्बीजीकरण (नसबंदी) आणि लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे. आतापर्यंत राज्यातील २ लाखांहून अधिक कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून १.८ लाख कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. मात्र, त्यानंतरही विरोधकांचे समाधान झाले नसल्याचे दिसून आले. अहिल्यानगरला जानेवारी ७,२३० रुग्णांची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यात जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्वानदंशाच्या ७,२३० रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत ४६३ ने अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी शहरात कुत्र्यांनी ३८ जणांना चावा घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणार मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मुंबईत पुढील सहा महिन्यांत तीन सुसज्ज निवारा केंद्रे उभारण्यात येतील. तसेच राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ‘पशू जन्म नियंत्रण केंद्रे’ स्थापन केली जात आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व स्थानिक प्रशासनांना देण्यात आले आहेत, असे सामंत यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *