Headlines

रामराजेंच्या सूचक स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण:‘वजीर-घोडे गेले, नवीन प्यादी इनकमिंग’ म्हणत नेमका इशारा कुणाला?




महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका सूचक सोशल मीडिया स्टेटसमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय चर्चांना चांगलाच वेग आला आहे. “As long as the king stands, the game is alive” असे वाक्य शेअर करत त्यांनी ‘वजीर घोडे गेले, नवीन प्यादी इनकमिंग सुरू झाले आहेत’ असा मजकूर पोस्ट केला आहे. त्यामुळे रामराजेंच्या या पोस्टचा नेमका राजकीय संदर्भ काय, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. स्टेटसमधून सूचक संदेश रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेअर केलेल्या स्टेटसमध्ये बुद्धिबळाच्या पटावरील ‘राजा’, ‘वजीर’, ‘घोडे’ आणि ‘प्यादी’ या शब्दांचा वापर करण्यात आला आहे. “वजीर घोडे गेले. नवीन प्यादी इनकमिंग सुरू झाले आहेत. उलटे निरोप सुरू झाले आहेत. जिथे आपण गेले आहात ती वन वे आहे. परतीची वाट नाही,” असा मजकूरही त्यांनी पोस्ट केला आहे. त्यामुळे या विधानातून कोणत्या राजकीय व्यक्ती किंवा गटाकडे संकेत करण्यात आला आहे, याची चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क रामराजेंच्या या पोस्टनंतर फलटणसह सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळातील संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या स्टेटसकडे पाहिले जात असून, ‘राजा’ आणि ‘नवीन प्यादी’ या उल्लेखांचा नेमका अर्थ काय, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. अधिकृत स्पष्टीकरण अद्याप नाही या सूचक स्टेटसबाबत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या पोस्टचा रोख नेमका कोणाकडे आहे आणि त्यामागे कोणती राजकीय खेळी आहे, याबाबत स्पष्टता आलेली नाही. मात्र, या पोस्टमुळे साताऱ्याच्या राजकीय पटावर पुढची चाल कोणाची असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. मनोज जरांगे यांची दबाव खेळी: महसूल मंत्री बावनकुळेंना टार्गेट करून जात पडताळणी समितीवर दबाव आणणे सुरू – वडेट्टीवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करून जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याची खेळी खेळत आहेत. जरांगे यांना सरकारची जिरवायची असेल तर जिरवा, सरकारला जरांगे पाटील यांची जिरवायची असेल तर जिरवा, पण यात ओबीसींचे नुकसान करू नका, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गुरुवारी नागपूरमध्ये बोलत होते. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *