![]()
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विटाजवळील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ ते १६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात कसा घडला? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात खानापूर तालुक्यातील विटाजवळील रेवणसिद्ध घाटात घडला. घाटातील रस्त्यावर दोन एसटी बस अचानक समोरासमोर आल्या आणि त्यांची थेट धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन मृत्यू, १५ हून अधिक जखमी या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच, दोन्ही बसमधील मिळून सुमारे १५ ते १६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हेही वाचा… विमानतळावर ‘बॉम्ब’ची मस्करी पडली महागात!:एका वाक्यामुळे थांबवले विमानाचे उड्डाण, प्रवाशाला पोलिसांची नोटीस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या खोडसाळपणामुळे मोठी खळबळ उडाली. दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात चढण्यापूर्वी सुरक्षा तपासणीदरम्यान ५५ वर्षीय प्रवाशाने “माझ्या बॅगेत बॉम्ब आहे” असे सांगितल्याने सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. या घटनेमुळे टेकऑफसाठी सज्ज असलेले विमान त्वरित थांबवण्यात आले आणि संपूर्ण सुरक्षा प्रक्रिया पुन्हा राबवण्यात आली. सविस्तर वाचा
Source link
सांगलीतील रेवणसिद्ध घाटात भीषण अपघात:2 एसटी बसची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, 15 हून अधिक प्रवासी जखमी