Headlines

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेची दमदार कामगिरी:राज्यात मिळवला द्वितीय क्रमांक, मुंबईत होणार सत्कार




एकात्मिक बालविकास सेवा योजनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेने दमदार कामगिरी केली असून राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषदेच्या यशाबद्दल ता 11 सप्टेंबर रोजी मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात अधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत महिला बाल विकास विभागाच्या वतीने सुमारे एक हजार अंगणवाड्या चालविल्या जातात. या अंगणवाडी मधून एक लाख बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. याशिवाय बालकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविले जात असून यामध्ये प्रामुख्याने पोषण आहार वाटप करणे, तसेच मध्यम कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांना आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून तपासणी करून औषधोपचार करण्याचे कामही केले जाते. दरम्यान मागील वर्षी राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम सप्टेंबर 25 ते ऑक्टोबर 25 या कालावधीत राबविण्यात आला. या सप्ताहामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाड्यांमधून विविध उपक्रम राबवून त्याच्या नोंदी घेण्यात आल्या.
यासाठी प्रकल्प अधिकारी सारिका सोरेकर, प्रिया लखमोड, विवेक वाकडे, तत्कालीन प्रकल्प अधिकारी धापसे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी मधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार, बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, पोषण आहाराबाबत जनजागृती, माता मेळावे, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक मेळावे आयोजित करून पोषण आहाराची माहिती देणे, विविध स्पर्धांचे आयोजन करणे यासह इतर उपक्रमांचा समावेश होता. राज्यामध्ये हिंगोली जिल्ह्याने या कार्यक्रमात एक महिन्याच्या कालावधीत विविध उपक्रम राबवून तब्बल एक लाख 35 हजार नोंदी घेतल्या आहेत. या कार्यक्रमात राबविण्यात आलेली उपक्रम तसेच घेतलेल्या नोंदी यामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचा राज्यामध्ये द्वितीय क्रमांक आला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजन कार्यालयाच्या वतीने मुंबई येथे तारीख 11 सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे. सलग पाच वर्ष उत्कृष्ट कामाची परंपरा जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने पोषण माह कार्यक्रमात मागील पाच वर्षापासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांच्या कार्यकाळात सलग चार वेळा जिल्हा परिषदेला राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर आता ही पाचवी वेळ आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *