Headlines

राहात्यात विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोझर:गुन्हेगाराला कायद्यापुढे झुकावेच लागणार; विखेंच्या भूमिकेमुळे पीडित कुटुंबाला दिलासा‎



राहाता शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच, प्रशासनाने आज एक मोठी आणि कडक कारवाई केली. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेले भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील य

.

ही धक्कादायक घटना घडल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी तातडीने पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. “महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्या नराधमांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर पोलीस, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून आरोपीच्या घरावर थेट हातोडा फिरवला.

या कारवाईमुळे राहाता शहरासह संपूर्ण तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन अत्यंत गंभीर असल्याचा कडक संदेश गेला आहे. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला कायद्यापुढे झुकावेच लागेल, ही भूमिका या कारवाईतून स्पष्ट झाली आहे. प्रशासनाच्या या धाडसी पावलाचे राहाता परिसरातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले असून, पीडित कुटुंबीयांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *