Headlines

राहुरी फॅक्टरीची सानिका कोबरणे शूटिंग व्हॉलीबॉल महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी:तेलंगणातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिवनेरी क्लबच्या चार खेळाडूंची निवड‎



छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत अहिल्यानगरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले. या यशाची दखल घेत राहुरी फॅक्टरी येथील ‘शिवनेरी क्लब’च्या चार खेळाडूंची ४५ व्या राष्ट्रीय शूटि

.

या निवडीत विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सानिका किरण कोबरणे हिची महाराष्ट्र मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तिच्या या यशाने राहुरी फॅक्टरीसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तेलंगणा राज्यातील मेहबूबाबाद येथे १२ ते १४ मे २०२६ या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी मुलींच्या गटातून सानिका कोबरणे, श्वेताली गोपाळे व जान्हवी जाधव यांची, तर मुलांच्या गटातून ऋषिकेश पिलोरे याची निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंना अम्युचर शूटिंग व्हॉलीबॉल राज्य फेडरेशनचे सचिव सुनिल कंठाळे, राज्य फेडरेशनचे सदस्य नाना काळे, अहिल्यानगर जिल्हा शूटिंग व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष मुस्ताक शेख तसेच प्रशिक्षक राजेंद्र पुजारी व संदीप निबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. खेळाडूंच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *