![]()
ठाणे येथील जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण मंडले यांच्या खुनाचा कराड पोलिसांनी थरारक उलगडा केला आहे. पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने पती अडथळा ठरत होता. त्यामुळे पत्नीनेच प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पत्नी, तिचा भाऊ, प्रियकर आणि त्याचा साथीदार अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. लक्ष्मण मंडले (वय 54) हे ठाणे जिल्ह्यात जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 6 जून रोजी पहाटे कराडमध्ये त्यांना कारखाली चिरडून ठार मारण्यात आले होते. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला. तपासादरम्यान मृताची पत्नी सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले होते. पतीला संपवण्यासाठी तीन लाखांची सुपारी पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सारिका मंडले हिची 2023 मध्ये प्रथमेश थोरात या 25 वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. पतीमुळे या संबंधांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याने त्याला संपवण्याचा कट रचण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. यासाठी प्रथमेश थोरात याला तीन लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप आहे. तपासानुसार, 5 जूनच्या रात्री लक्ष्मण मंडले ठाण्याहून कराडकडे निघाले होते. त्यांच्या हालचालींची माहिती पत्नी सारिका सतत फोनवरून घेत होती. ही माहिती तिने प्रियकर प्रथमेश थोरात याच्यापर्यंत पोहोचवली. कराडमधील कोल्हापूर नाका परिसरात लक्ष्मण मंडले पायी घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून कारने चिरडत त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पत्नी सारिका मंडले, तिचा भाऊ संग्राम चव्हाण, प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. या खुनामागील संपूर्ण कट, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या भूमिकेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला!:अंमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघात; गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 जणांसह 6 ठार साखरपुड्याच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कार, एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून धरणगाव येथील मोटारसायकलस्वाराचाही जागीच मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा
Source link
लव्ह अफेअर, सुपारी अन् कारने चिरडले…:ठाण्यातील इंजिनिअरच्या मृत्यूचे गूढ उलगडले; नेमकं काय घडलं?