![]()
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव 2026’च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या परिषदेमुळे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वंदे मातरम्’ म्हणणार असल्याचे सांगत शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026’ मुंबईमध्ये ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत विविध देशांतील धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि प्रतिनिधी सहभागी होत असून, नवीन तंत्रज्ञान, नवे विचार आणि शहरी विकासाच्या विविध संकल्पनांवर चर्चा होणार आहे. जगासमोर सध्या हवामान बदल, जागतिक तापमानवाढ आणि शाश्वत विकास ही मोठी आव्हाने आहेत. या समस्यांवर विविध देशांनी एकत्रितपणे मार्ग काढण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत ब्रिक्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही परिषद महत्त्वाची असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईसह जगातील मोठ्या शहरांमधील नागरिकांचे जीवनमान अधिक चांगले कसे करता येईल, प्रदूषणमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त शहरे कशी निर्माण करता येतील, तसेच पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास कसा साधता येईल, यावर परिषदेत विचारविनिमय होणार आहे. एआय, स्टार्टअप आणि पायाभूत सुविधांवरही चर्चा शहरीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे शहरांचा नियोजनबद्ध विकास करणे ही काळाची गरज असल्याचे शिंदे यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स आणि आधुनिक तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवरही परिषदेत चर्चा होणार आहे. विविध देशांतील प्रतिनिधी आणि धोरणकर्ते आपल्या कल्पना व अनुभव एकमेकांशी शेअर करतील. त्यातून भविष्यातील शहरांच्या विकासासाठी नवीन दिशा मिळू शकते आणि त्याचा फायदा सहभागी शहरांना होईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम्’; एकनाथ शिंदेंनी केले स्वागत दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वंदे मातरम्’ म्हणणार असल्याच्या मुद्द्यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. हा देशासाठी ऐतिहासिक क्षण असेल, असे शिंदे म्हणाले. देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम्’ म्हणणार आहेत, ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ‘वंदे मातरम्’चा इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यवीरांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी बलिदान दिले. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ हे देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे गीत आहे. ‘वंदे मातरम्’ला विरोध करू नये लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम्’चा जयघोष होणे हा देशातील नागरिकांसाठी प्रेरणादायी क्षण ठरेल. त्यामुळे या निर्णयाला कोणीही विरोध करू नये, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम्’ म्हणणार आहेत, हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे युवकांसह नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक प्रबळ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. ‘वंदे मातरम्’च्या माध्यमातून देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक जागृत होईल, असे ते म्हणाले. हेही वाचा… मनोज जरांगे पाटील सातारा दौऱ्यावर:मायणीमध्ये आज सभा, तर मुंबईत मराठा आरक्षण उपसमितीचीही महत्त्वाची बैठक मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीनंतर आता ते सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज मायणी, मसूर आणि पाचवड येथे त्यांच्या बैठका आणि सभा होणार असून, उद्या पाटणमध्ये जाहीर सभा आणि साताऱ्यात पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारही सक्रिय झाले आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम्’चा जयघोष ऐतिहासिक क्षण:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागत