![]()
जामनेर बसस्थानकातून सोमवारी पहाटे तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत असलेली बस एका चोरट्याने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 किमी अंतरावर कोंदोलीमार्गे शहापूरकडे जाताना टायर फुटल्याने चोरटा बस वाटेतच सोडून पसार झाला.
.
जळगाव जामनेर ही अखेरची फेरी मारून बस चालक अनिल कोळी यांनी कंट्रोल केबिनसमोर असलेल्या फलाट नंबर दोन वर लावली. नेहमीप्रमाणे चावी गाडीलाच ठेवून ते निघून गेले. त्यानंतर रात्री ११ वाजेदरम्यान एक अज्ञात व्यक्ती बेंचवर झोपला. तेथे एकही प्रवासी नाही, वाचमन नाही हे पाहून दोन वाजून २८ मिनिटांनी त्या व्यक्तीने स्थानकातून बस चोरून कोदोली मार्गे शहापूरकडे वळवली.
बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
चोरट्याने पळवलेली ‘जिजाऊ’ बस ही एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्वात अत्याधुनिक गाड्यांपैकी एक आहे. या बसमध्ये प्रवाशांच्या आणि गाडीच्या सुरक्षेसाठी ४ हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे, रियल-टाईम लाइव्ह जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि इमर्जन्सी पॅनिक बटणे बसवण्यात आलेली आहेत.
वॉचमन असताना हे कसे घडले, याची चौकशी करू
अनेक बस बटण स्टार्ट आहेत. ज्या गाड्यांना चावी असते, ती चावी गाडीतच ठेवण्याची पद्धत आहे. प्रकारावरून चोरटा निष्णात चालक असावा असे दिसते. आगारात वॉचमन असताना हे कसे घडले, याची चौकशी करू. पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. – दिनेश नाईक, आगार व्यवस्थापक, जामनेर