![]()
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चांदूर रेल्वे शहरात शनिवारी उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. मिलिंद नगर येथून निघालेल्या शोभायात्रेत समाजबांधवांसह महिला, युवक-युवती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नों
.
प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर निघालेल्या शोभायात्रेचे शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. सरदार चौक, क्रांती चौक, सिनेमा चौक, मेन मार्केट रोड, जुना बसस्टॅंड चौक येथून मार्गक्रमण करत शोभायात्रा नगर परिषद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा मिलिंद नगर येथेच शोभायात्रेचा समारोप झाला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रताप अडसड, भाजपा नेते रावसाहेब रोठे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस परीक्षित जगताप, नगराध्यक्षा प्रा. प्रियंका विश्वकर्मा, वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निलेश विश्वकर्मा, नगरसेवक हाजी अनिस सौदागर, सुमेध सरदार, ॲड. किर्ती इमले, पप्पू भालेराव, गजानन ठाकरे, आचल प्रधान, माजी नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, माजी नगरसेवक सतपाल वरठे, प्रफुल्ल कोकाटे, अजय हजारे, नंदा वाधवानी, निवास सूर्यवंशी, सारंग देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.