Headlines

वसंत डावखरे मानहानी प्रकरण:उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची निर्दोष मुक्तता, तब्बल 17 वर्षानंतर महत्त्वपूर्ण निकाल




दिवंगत नेते वसंत डावखरे मानहानी खटल्याचा अंतिम निकाल समोर आला आहे. यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. 17 वर्षांनंतर वसंत डावखरे प्रकरणी हा निकाल लागलेला असून यात ठाकरे शिंदे यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकची माहिती अशी की, 2009 मध्ये कथित सीडी प्रकरण होते, ही सीडी लॅबमध्ये देखील पाठवण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने 313 प्रमाणे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह इतरांचे साक्ष नोंदवले होते. मात्र जे साक्ष होते, त्यांची साक्ष या सगळ्याबाबतीत आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले होते. आज कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रथम वर्ग संतोष आगे यांच्या दालनात आज या संदर्भात अंतिम निकाल लागला असून ठाकरे आणि शिंदे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रदीर्घ खटल्यादरम्यान 20 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यात आले. आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे खोटे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा जोरदार युक्तिवाद बचाव पक्षाने केला, ज्यानंतर अखेर न्यायालयाने सर्व आरोपींचे कलम 313 अंतर्गत जबाब नोंदवून ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली. नेमके प्रकरण काय होते? 2009 च्या कल्याण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे आनंद परांजपे यांच्यात लढत होती. त्यावेळी कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात परांजपे यांच्या प्रचारार्थ आयोजित शिवसेनेच्या सभेत, डावखरे यांचे ‘मारा झोडा, मला कसे पण निवडून आणा, बाकीचे मी बघतो’ असे आक्षेपार्ह वक्तव्य असलेली एका खाजगी सभेतील सीडी दाखवण्यात आली होती. यातून डावखरे यांची बदनामी केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात शिवसेना नेते उद्धव ठाकरे, तत्कालीन जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, उमेदवार आनंद परांजपे आणि सभेचे आयोजक रमाकांत देवळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाचा खटला सध्या कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश आगे यांच्यासमोर सुरू असून, यातील मूळ फिर्यादी वसंत डावखरे आता हयात नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *