![]()
राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘’मुंबई ग्रोथ हब’’ उपक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या बहुचर्चित वाढवण बंदर व वाढवण प्रभाव क्षेत्राच्या विकासकामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नगर
.
नीती आयोगाच्या सहकार्याने राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी ‘’मुंबई महानगर प्रदेश आर्थिक बृहत् आराखडा’’ तयार करण्यात आला आहे. याच आराखड्याचा भाग म्हणून वाढवण बंदर परिसराचा सर्वसमावेशक विकास केला जात आहे. नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव (नवि-१) हे ‘’मिशन संचालक’’ म्हणून या सर्व विभागांच्या विकासकामांचा आणि गुंतवणुकीचा वेग वाढवण्यासाठी थेट समन्वय व नियंत्रण ठेवणार आहेत.
रोजगाराच्या लाखो नवीन संधींमुळे प्रकल्प महत्त्वाचा वाढवण बंदर हे केवळ एक बंदर न राहता ‘’एकात्मिक बंदर-आधारित आर्थिक विकास केंद्र’’ म्हणून विकसित केले जाणार आहे. या संपूर्ण प्रभाव क्षेत्रामध्ये लॉजिस्टिक्स आणि उत्पादन केंद्रे, नवीन शहरे आणि प्रस्तावित विमानतळ, बोईसर बुलेट ट्रेन प्रभाव परिसर आणि पर्यटन स्थळे या सर्वांचा एकत्रित विकास साधला जाणार आहे. नवीन उद्योगांमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक येण्यासोबतच रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होतील.