![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने देशभरात एका मोठ्या ‘सेवा संकल्प अभियाना’ची सुरुवात केली आहे. याच अभियानांतर्गत आता पंतप्रधान मोदींच्या आयुष्यातील न ऐकलेले किस्से आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी थेट जनतेसमोर येणार आहे. या संदर्भात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एका नव्या आणि भव्य मोहिमेची माहिती दिली आहे. ‘हनुमान अंश प्रमाणे मोडणार रेकॉर्ड’ मुंबईतील केसी महाविद्यालयात ‘नमो सेवा – अनसुनी कहानियाँ’ या पथनाट्य उपक्रमाचा नुकताच दिमाखात शुभारंभ झाला. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी मोठा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदीजींच्या चरित्रातून आपल्याला सेवाभाव, सुशासन आणि राष्ट्रभक्तीची शिकवण मिळते. ‘हनुमान अंश’ या नवोदित कलाकारांच्या चित्रपटाने ज्याप्रमाणे रेकॉर्ड निर्माण केले, अगदी त्याचप्रमाणे मोदींच्या जीवनावरील ‘नमो सेवा गाथा’ हे पथनाट्य देखील नवे रेकॉर्ड करेल.” काय आहे भाजपचा मेगाप्लॅन? या पथनाट्याच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील नवोदित कलाकार संपूर्ण महाराष्ट्रभर मोदींच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सादर करणार आहेत. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा प्रयोग आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान १० पथनाट्य प्रयोग आयोजित करण्याचे मोठे उद्दिष्ट भाजपच्या वतीने ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर हे पथनाट्य सादर होणार असून, नवोदित कलाकारांना या माध्यमातून जनजागृती करण्याची मोठी संधी मिळणार आहे
Source link
पंतप्रधान मोदींच्या आयुष्यातील गुपिते उलगडणार?:रवींद्र चव्हाणांनी सांगितली भाजपच्या नव्या मोहिमेची 'आतली बातमी'