Headlines

अजित पवारांचे नाव न वापरता निवडणूक लढा':सुनेत्रा पवारांचे आव्हान; 'दादांना मनातून कसे काढणार?' पुरुषोत्तम जगतापांचा सवाल




बारामती तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडखोरीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादीतून बंडाचे निशाण उभारलेले नेते पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर, अजितदादांचे नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवून दाखवा, असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले होते, ज्यावर आता पुरुषोत्तम जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना पुरुषोत्तम जगताप म्हणाले, कारखान्याच्या विकासाच्या आणि सभासदांच्या हिताच्या मुद्द्यावरूनच आम्ही बाहेर पडलो आहोत. अजितदादांची गणना ही महापुरुषांमध्ये केली जाते. त्यामुळे मी अजित पवारांचे नाव वापरणारच. सुनेत्राताई अजितदादांना सभासदांच्या मनातून आणि हृदयातून कसे बाहेर काढणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अजित पवारांचा फोटो बॅनरवरून हटवला सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्या लेटरहेडवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात, अजित पवार यांच्या नावाचा किंवा छायाचित्राचा वापर करण्यापूर्वी कुटुंबीयांची रीतसर परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी वानेवाडी येथील आपल्या प्रचार मेळाव्यात लावलेला अजित पवारांचा फ्लेक्स काढून टाकला आणि या मेळाव्यात ते म्हणाले की, अजितदादा सभासदांच्या मनात आणि आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे फोटो लावला किंवा नाही लावला, तरी काहीही फरक पडत नाही. सोमेश्वर कारखाना निवडणूक: 83 उमेदवारांमध्ये रंगणार तिरंगी लढत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 30 सप्टेंबर या अंतिम मुदतीनंतर तब्बल 431 जणांनी माघार घेतल्याने आता 83 उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे पॅनेल, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील एक पॅनेल आणि भाजपच्या पाठिंब्याने पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल अशा तीन पॅनेलमध्ये चुरशीची तिरंगी लढत होणार असून तीनही बाजूंनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *