Headlines

‘वाळूच्या ट्रिपचे 10 हजार देतो’ची थाप मारून ‘समृद्धी’वरील दरोडेखोर पकडले:संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची बीडमध्ये वेशांतर करून कारवाई



समृद्धी महामार्गावर वाहनचालकाला अडवून लुटणाऱ्या टोळीतील फरार आरोपींना पकडण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. ‘वाळूचा हायवा चालवायचा आहे, एका ट्रिपचे तब्बल १० हजार रुपये देऊ,’ अशी थाप पोलिसांनी मारली. या आमिषाला भुलून आरोपी

.

ओमकार रामचंद्र फसले (२२, रा. म्हाळस जवळा, जि. बीड), भीमराव ऊर्फ शहादेव भगवान तांदळे (२६, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी), सुनील गणपत चव्हाण (२२, रा. दामूनाईक तांडा, ता. गेवराई) आणि सुनील कल्याण शेंडगे (२६, ह.मु. रांजणगाव शेणपुंजी, छत्रपती संभाजीनगर) अशी या नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २६ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावरील हडसपिंपळगावजवळ एका वाहनचालकाला लुटल्याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी ७ आरोपींना अटक झाली होती; मात्र उर्वरित आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते.

वाँटेड गुटखा तस्करही जेरबंद

एलसीबीच्या दुसऱ्या पथकाने कायगाव टोका परिसरात सापळा रचून भीमराव ऊर्फ शहादेव तांदळे आणि सुनील चव्हाण यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दरोड्यासाठी टोळीला स्वतःचे वाहन पुरवणारा सुनील शेंडगे यालाही तिसगाव परिसरातून पकडण्यात आले. सुनील हा मुख्य आरोपी परशुराम गायकवाडचा साथीदार आहे. विशेष म्हणजे वाळूजमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाच्या अंगावर गाडी घालून गुटख्याचा टेम्पो पळवल्याप्रकरणी तो पोलिसांना ३ महिन्यांपासून गुंगारा देत होता. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या पथकाने केली.

असा रचला सापळा

फरार आरोपी ओमकार फसले हा गावातच लपल्याची माहिती एलसीबीला (स्थानिक गुन्हे शाखा) मिळाली. थेट गावात गेल्यास तो पळून जाईल म्हणून पोलिसांनी ठेकेदाराचे वेशांतर केले. गावातील एका पानटपरीवर जाऊन, ‘उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाळूचा हायवा चालवण्यासाठी ड्रायव्हर हवा आहे, एका ट्रिपचे १० हजार रुपये देऊ,’ अशी ऑफर पानटपरी चालकाला दिली. पानटपरी चालकाने ही माहिती ओमकारच्या मित्राला फोनवरून दिली. १० हजारांच्या आमिषाला भुललेला ओमकार जाळ्यात अडकला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *