Headlines

वाळू वाहतुकीवरून चालकाला मारहाण:हप्त्यासाठी दिली धमकी, पैठण शहराजवळील घटना, जार जणांविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल‎




वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावरून चालकाला अडवून मारहाण करत हप्ता उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवा चालक विजय आसाराम गायकवाड (रा. नारायणगाव, ता. पैठण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. २२) दुपारी ते शेवगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरून जात असताना पैठण येथील महावीर चौक (गोलनाका) येथे संशयित अरुण काळे (रा. वडवाळी), राधाकिसन उर्फ बंडू मच्छिंद्र निवारे (रा. जुने कावसान), नारायण अशोक कर्डिले (रा. पाटेगाव) व शुभम ठाणगे (रा. इंदिरानगर) यांनी वाळूचा हायवा अडवून चालकास जबरदस्तीने गाडीतून खाली ओढले. ‘तू वाळूची वाहतूक करतोस. आम्हाला हप्ता द्यावा लागेल’, अशी धमकी देत शिवीगाळ केली. भीतीपोटी फिर्यादीने १० हजार रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपींनी चापट-बुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *