![]()
राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असला, तरी गेल्या काही दिवसांतील धुव्वाधार पावसाने सर्व कसर भरून काढली आहे. सध्यातरी राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. मात्र, असे असले तरी भारतीय हवामान विभागाने आज विदर्भासाठी पावसाचा महत्त्वाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून मुंबईकरांसह बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा जोर वाढणार; एल-निनोचा अंदाज ठरला फोल यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे देशात पावसाचे प्रमाण कमी राहील आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र, हा अंदाज फोल ठरवत संपूर्ण देशात मान्सून जोरदार सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा एकदा पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आज विशेषतः विदर्भात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून तिथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र काही अंशीच पाऊस कोसळेल. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ; पाहा आकडेवारी दोन-तीन दिवसांपूर्वी इगतपुरी आणि नाशिक परिसरातील धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे वैतरणा धरणही आता ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. प्रमुख धरणांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे: सध्या पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतल्याने धरणांतील पाणी वाढण्याचा वेग काहीसा मंदावला आहे. भविष्यातील पाणीसाठा आता आगामी काळात होणाऱ्या पावसावरच अवलंबून असेल. पुण्यात पावसाची उघडीप पुणे शहर आणि जिल्ह्यात सलग आठ दिवस कोसळणाऱ्या संततधारेने मागील २४ तासांपासून पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. काल दिवसभर शहरातील आकाश अगदी निरभ्र होते. त्यामुळे सततच्या पावसाने कंटाळलेल्या पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला असला, तरी शेतीसाठी आणखी चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरण उशाला अन् कोरड घशाला; इगतपुरीत महिला रस्त्यावर
एकीकडे धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असताना आणि धरणे भरत असताना, इगतपुरी नगर परिषद हद्दीतील ‘गिरणारे’ गावात मात्र संतापजनक परिस्थिती आहे. भर पावसातही या गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आठवड्यातून केवळ तीन दिवस आणि तेही फक्त २० ते ३० मिनिटे नळाला पाणी येते. पाणी येण्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्याने त्रस्त झालेल्या आणि संतापलेल्या महिलांनी अखेर रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला आहे. हेही वाचा.. MP-राजस्थानसह 10 राज्यांमध्ये पाऊस गायब:ढग पूर्वेकडे सरकले; उत्तराखंड-हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद; मिझोराममध्ये 4 दिवसांपासून पर्यटक अडकले मध्य प्रदेश, राजस्थानसह देशातील 10 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस मान्सून कमकुवत राहील. या राज्यांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे देशाच्या पश्चिम भागातून ढग नाहीसे होणे. नवीन उपग्रह प्रतिमांमध्ये ढग उत्तराखंड, यूपी, बिहार, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या पूर्वेकडील राज्यांकडे सरकले आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मिझोराममधील लुंगलेई जिल्ह्यात पावसानंतर खावथलांगतुइपुई नदीची पाणी पातळी वाढल्याने 80 हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. राज्यात 29 ठिकाणी भूस्खलन झाले. लुंगलेई जिल्ह्यातील बुआल्ते गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 54 बंद झाला आहे, जिथे गेल्या चार दिवसांपासून अनेक पर्यटक अडकले आहेत. सविस्तर वाचा
Source link
विदर्भात आज पावसाचा इशारा:पुढील आठवड्यात राज्यभर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज