Headlines

पत्नीच्या प्रियकराचा त्रास, विवाहानंतर दोन महिन्यात पतीने केली आत्महत्या:दोघांविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा, गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा‎



पत्नीसह तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयताच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली असून दोघाजणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना

.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील यावली येथील संजय राजाराम राऊत (वय २६) याचा विवाह दोन महिन्यापूर्वी झाला होता. माझ्या मुलाची पत्नी व तिचा प्रियकर सौरभ शिंदे याचे प्रेमसंबंध होते.

मुलाच्या मरणास त्याची पत्नी व सौरभ सदाशिव शिंदे (रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) हे दोघेजण कारणीभूत आहेत, म्हणून राजाराम नागनाथ राऊत यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार वरील दोघा जणांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कोल्हाळ हे करीत आहेत.

या त्रासाला कंटाळून दि. ७ जून रोजी रात्री माझा मुलगा संजय राजाराम राऊत (रा. यावली) यास त्याची पत्नी व तिचा प्रियकर सौरभ शिंदे हे दोघेजण त्रास देत असल्याने, त्यांच्या प्रेमसंबंधामधील त्रासाला कंटाळून तसेच पत्नी ही शरीरसंबंध ठेवू देत नसल्याच्या त्रासाला कंटाळून मुलगा संजय याने घरातील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *