![]()
राज्यातील हवामानात सध्या कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असतानाच, विदर्भासह बहुतांश महाराष्ट्रात उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४६ अंशाच्या पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघाले आहेत. दरम्यान, या तीव्र उष्णतेच्या लाटेतच संपूर्ण देशासाठी आणि बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. वर्ष २०२६ च्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी भारताच्या दिशेने आपली वाटचाल कमालीची गतिमान केली आहे. विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट पसरली असून पारा ४६ अंशाच्या वर गेला आहे. सूर्य ओकत असलेल्या या आगीमुळे दुपारी १२ वाजल्यापासूनच अनेक शहरांमधील प्रमुख रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ही उष्णतेची लाट पुढील काही दिवस अशीच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील प्रमुख शहरांमधील तापमान (अंशात): चिंतेच्या सावटात सुखावणारी बातमी; मान्सूनची जवळ पोहोचला एकीकडे ऊन अंगाची लाहीलाही करत असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, १८ मे २०२६ रोजी मान्सूनबाबत अत्यंत सकारात्मक माहिती दिली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आग्नेय अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, कोमोरीन भाग आणि नैऋत्य व आग्नेय बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात यशस्वीरीत्या प्रगती केली आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात सध्या मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अत्यंत पोषक आणि अनुकूल वातावरण तयार झाले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत हे मोसमी वारे आग्नेय अरबी समुद्र, कोमोरीन क्षेत्र, बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांत आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये वेगाने पुढे सरकतील. अंदमानमध्ये मान्सून वेळेत दाखल झाल्यामुळे आता भारताच्या मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये मान्सून नेमका कधी धडकणार, याकडे उभ्या देशाचे डोळे लागले आहेत. मान्सूनच्या या वेगवान वाटचालीमुळे यंदा वेळेवर पाऊस पडेल, अशी आशा निर्माण झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Source link
विदर्भाला उष्णतेचा प्रचंड तडाखा:अमरावती-वर्ध्यात पारा 46 अंशाच्या पार; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?