Headlines

विद्याभारती महाविद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा:विद्यार्थ्यांनी सादर केल्या दर्जेदार कलाकृती, विजेत्यांची घोषणा




अमरावती येथील कॅम्प स्थित विद्याभारती महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्याभारती शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत यांच्या वाढदिवसानिमित्तही हा कार्यक्रम घेण्यात आला. जेम्सच्या अध्यक्षा मंजीरीताई शेखावत यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याभारती शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्ष मेजर प्राचार्य डॉ. एम. एम. राठौर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष रघुनाथ रोडे, प्रतिभाताई पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. व्ही. शिरभाते, विद्याभारती फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. पांडे, आयटीआयचे प्राचार्य जी. बी. तंवर, डॉ. पी. एस. येनकर, विद्याभारती जेम्सचे समन्वयक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एच. के. सिसोदिया, जेम्स कोर कमिटी सदस्य प्रा. अथर इक्बाल, प्रा. लविना गोन्सालविस, प्रा. निलेश डवले आणि डॉ. सुरज रोडे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. एम. एम. राठौर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या उद्देशाने जेम्सतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात, असे प्रतिपादन केले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये धैर्य निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो, असेही त्यांनी नमूद करत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत विविध शाखांतील एकूण ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ‘सोलो’ (एकलगान) प्रकारात २५ विद्यार्थ्यांनी, तर ‘समूहगीत’ प्रकारात ४ ग्रुपनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. स्पर्धेचे परीक्षण राजेश परमार, प्रा. शैलेश जावरकर आणि प्रा. वैभवी चापोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झुबिया अहमद, यतिका भटकर, सेजल सस्ते आणि काव्या एरूळकर यांनी केले. जेम्सच्या विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संयोजनात आणि उल्हासपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे: समूहगीत स्पर्धेत गौरी प्रधान आणि ग्रुप (११ वी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर ओम ठाकरे आणि ग्रुप (डी. फार्म भाग २) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सोलो (एकलगान) स्पर्धेत हिमांशी शिस्ते (बी.एस्सी भाग १) प्रथम, माही गिरे (बी.कॉम भाग २) द्वितीय आणि म्रिष्ठा मुजुमदार (बी. ए. भाग १) तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *