Headlines

विद्यार्थ्यांच्या अंदोलनात 'सिर्फ अल्लाह का नाम रहेगा'च्या घोषणा कशासाठी?:आंदोलनात देशविरोधी शक्ती अन् 'तुकडे-तुकडे गँग- नवनाथ बन




दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सुरू असलेले आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आणि नीट पेपरफुटी संदर्भात असल्याचे सांगितले जाते मग आंदोलनस्थळी सिर्फ अल्ला का नाम रहेगा अशा घोषणा का दिल्या जातात? प्रेमानंद महाराज पाखंडी आहेत अशा घोषणा का दिल्या जातात? या आंदोलनाचा आणि नीटच्या विद्यार्थ्यांचा काही संबंध आहे का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. या सर्व गोष्टीचे उत्तर संजय राऊत आणि विरोधकांनी दिले पाहिजे. नवनाथ बन म्हणाले की, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये देशविरोधी शक्त्या आलेल्या आहेत. हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी सांगितले जाते, नीट पेपरफुटी प्रकरणासाठी हे आंदोलन असल्याचे सांगितले जाते. मग तुकडे-तुकडे गँग या आंदोलनामध्ये का सहभागी का झाली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करू अशा घोषणा या आंदोलनात का दिल्या जात आहेत? 370 कलम हटवल्याबद्दल राग या आंदोलनात का व्यक्त केला जातो? असा सवाल बन यांनी केला आहे. हिंदूमध्ये फुट पाडणे हा राऊतांचा अजेंडा नवनाथ बन म्हणाले की, नीट पेपरफुटीवर संजय राऊतांनी राहुल गांधींना प्रश्न विचारायला हवे होते. मोटेगावकरचा थेट संबंध हा काँग्रेससोबत आहे. काँग्रेसचे कुंकू कपाळी लावले आहे असे ते थेट सांगत होते. विद्यार्थ्यांच्या नावाखाली देशविरोधी शक्तींना संरक्षण देण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे, हे विद्यार्थ्यांचे आंदोलन नाही. या आंदोलनामध्ये तुकडे-तुकडे गँग, सिर्फ अल्ला तेरा नाम रहेगा या देशविरोधी शक्ती आल्या आहेत त्यांना तरुण धडा शिकवणार. हिंदूमध्ये फुट पाडणे हा राऊतांचा अजेंडा आहे. राऊत जनरल लायर नवनाथ बन म्हणाले की, जनाब संजय राऊत तुम्ही जनरल लायर आहात. जसे जनरल डायरने गोळ्या झाडल्या होत्या त्या पद्धतीने तुम्ही जनरल लायर बनून राऊत आणि उबाठा देशात अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. इंडिया आघाडी आणि मविआ देशात आणि राज्यात खोटे पसरवण्याचे काम करत आहेत. देशातील तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी उभी आहे. तुम्ही कितीही खोटे बोलले किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा काही फायदा होणार नाही. तुमची ओळख जनरल लायर म्हणून झाली आहे ती तशीच राहील. जनतेला शांतता हवी नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांना या देशात दंगली घडवायच्या आहेत. त्यांना तरुणांना भडकावत दंगल झाली पाहिजे असे वाटते पण देशातील जनता हुशार आहे. राऊतांचा दंगलमिलन’चा डाव जनतेने हाणून पाडला आहे, जनतेला शांतता हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात क्रांती झाली आहे. रस्ते झाले, आर्थिक प्रगती झाली, मेट्रो प्रकल्प झाले. तर राऊतांच्या काळात केवळ घोटाळ्यामध्येच क्रांती झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *