Headlines

Chandrashekhar Bawankule Statement On Delhi Protest


दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जवरून आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना, भाजपने विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. “दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे केवळ सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी आणि देशातील युवकांच

.

दिल्लीतील आंदोलनावर आणि पेपरफुटी प्रकरणावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “परीक्षेचा पेपर फुटला ही निसंशयपणे एक मोठी चूक आहे, त्यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, याचा अर्थ असा होत नाही की केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान किंवा केंद्र सरकारने स्वतः जाऊन तो पेपर फोडला आहे. प्रशासकीय व्यवस्थेत (सिस्टीम) कुठेतरी बदमाशी आणि गैरप्रकार झाला आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून सरकारने स्वतःहून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि चौकशीसाठी निष्पक्ष तपास यंत्रणा नेमली आहे.”

ते पुढे म्हणाले, “तपास यंत्रणा आपले काम करत असतानाही विद्यार्थ्यांना भडकावून रस्त्यावर उतरवणे हा निव्वळ राजकीय कट आहे. कालच्या आंदोलनात अचानक जी दगडफेक झाली, ती उस्फूर्त नव्हती. त्यासाठी आधीच २ ते ३ ट्रक भरून दगड गोळा करून आणले गेले होते. ही दगडफेक कुणी केली? त्यामागे कोणते असामाजिक तत्त्वे आहेत? याचा सखोल तपास झाला पाहिजे.”

राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना ‘तरुण विरोधी पंतप्रधान’ म्हटल्याचा कडक शब्दांत समाचार चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. “या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीनदा पंतप्रधानपदी आरुढ केले आहे. १४० कोटी भारतीयांनी मोदींना प्रचंड बहुमत दिले आहे. काहीतरी सरकारविरोधी भूमिका स्वीकारायच्या, असे सुरू आहे,” अशी टीका बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

रिक्रूटमेंट रूल्सचे नोटिफिकेशन जारी

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महसूल खात्याच्या आस्थानेचा आरआरचे नोटिफिकेशन आम्ही काल काढलेले आहे. ते नोटिफिकेशन आज प्रसिद्ध झालंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आरआरला मान्यता दिली. ही आस्थापनाविषयक प्रक्रिया खूप दिवसांपासून रखडलेली होती, ती आता पूर्ण झालेली आहे. याबाबत मी सर्व महसूली अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या आस्थापनातील प्रमोशन, त्यांच्या निवडी याबाबतच्या निर्णयाचे नोटिफिकेशन काल निघालेले आहे.”

एसआरए घोटाळ्यावर चौकशीचे संकेत

मुंबईत एफएसआय घोटाळा झालेला आहे. युनिकॉर्न बिल्डरने १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. एसआरएमध्ये जे अधिकारी आहेत, तिथेच राहतात परत येत नाहीत. याबाबत चौकशीची मागणी होत आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, “हे खरं आहे की, एसआरएमध्ये वर्षानुवर्षे काही अधिकारी बसलेले आहेत. मुख्यमंत्री याचा तपास करतील. पण तिथे काय घोटाळा झाला हे मला आज माहिती नाही. परंतु निश्चितपणे मी समजून घेईन आणि यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाली असेल, तर मुख्यमंत्री चौकशी करतील. महसूल खात्याकडे आली तर मी करेन. नगरविकास खात्याकडे गेली तर नगरविकास मंत्री करतील.”

हे ही वाचा…

भाजपच्या ‘जनरल कायर’ने तरुणांवर लाठीचार्ज केला:दिल्लीत जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती, राऊतांचा सरकारवर निशाणा

दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे तिथे जमलेले लोकं कोणत्या व्यक्तीच्या मागे तिथे आलेले नाहीत. राहुल गांधी आणि आम्ही सर्वांनी नीट पेपरफुटीचा मु्द्दा उचलून धरला त्यातून ही लढाई सुरू झाली, त्या लढाईत तेल ओतण्याचे काम देशाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी केले, त्यामुळे हा भडका उडाला आहे. पेपरफुटीचे केंद्र हे महाराष्ट्र आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला पाहिजे, यात आरएसएस लोकं आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.