![]()
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत १७ जागा जिंकण्याचा निर्धार करत महायुतीने आपली रणनीती आखली आहे. जागावाटपावरून विरोधकांकडून टीका होत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांना लक्ष्य केले आहे. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून, सन्मानजनक जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होईल, असे संकेत वरिष्ठ स्तरावरून मिळत आहेत. मात्र, १७ जागांसाठी १५० पेक्षा अधिक इच्छुकांमुळे महायुतीत ताणाताणी सुरू असल्याचे चित्र आहे. महायुतीचा फॉर्म्युला अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झाला नसला तरी, सूत्रांच्या माहितीनुसार भाजप ११, तर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट उर्वरित जागांसाठी आग्रही आहे. काही पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर अर्ज खरेदी केल्याची चर्चा असली, तरी ‘महायुतीचा धर्म’ पाळला जाईल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी ५ जून रोजी नवीन नियुक्त्यांची प्रक्रिया पार पडणार आहे, असे ते म्हणाले शिवसेनेचे टार्गेट ६ जागांचे, म्हणून पेच… महायुतीत ११-४-२ अशा जागावाटपाची चर्चा असली, तरी शिवसेनेने ६ जागांची मागणी लावून धरल्याने पेच वाढला आहे. नाशिक, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि जळगाव या जागांवरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. पुण्याच्या जागेवरही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच आहे. ‘मोठा भाऊ’ कुणाचे ऐकणार, यावरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. माझ्या दिल्ली दौऱ्याने कोणाच्या पोटात दुखते ते बघत असतो : एकनाथ शिंदे गेल्या १० दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोनदा दिल्लीत अमित शाह यांना भेटले. त्याबद्दल उलटसुलट चर्चा झाली. याविषयी शिंदे म्हणाले की, मी दिल्लीत आलो की तिकडे चर्चा होते की शिंदे नाराज. कोण नाराज झाले? कुणाच्या पोटात दुखायला लागले?
Source link
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 150 वर इच्छुकांमुळे महायुतीत ताणाताणी:मुख्यमंत्री फडणवीसच अंतिम निर्णय घेणार