![]()
येथील समाजश्री डॉ. प्रशांत हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे ‘वृक्षदिंडी’ आणि जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वरुणराजाच्या हलक्या सरी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीमुळे संपूर्ण रावळगाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही वृक्षदिंडी रावळगाव प्रवेशद्वारापासून निघून बसस्थानक, श्रीराम मंदिर गल्ली, वड चौक, बाजारपट्टी आणि एम-टाईप चाळ मार्गे पुन्हा शाळेच्या मैदानावर आली. तेथे सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला. याप्रसंगी योगी रामसुरतकुमार शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष अशोक आखाडे, वृत्तपत्र विक्रेते नरेंद्र येवले, दिलीप कुलकर्णी, कैलास चोपडे, शाळेचे प्राचार्य आर. व्ही. मोरे, पर्यवेक्षक व्ही. एच. बागूल आदी उपस्थित होते.
Source link
वृक्षदिंडी:पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रावळगाव विद्यालयाची वृक्षदिंडी