Headlines

शरद पवारांचे वारकरी संप्रदायाबाबतचे विधान योग्य:काही जण संतांविरोधात बोलतात, पण प्रतिगामी विचारांचे लोक शांत बसतात – रोहित पवार




“वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला समता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली आहे. मात्र, अलीकडच्या काळात या संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असून, यामुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत आहे,” अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेला आमदार रोहित पवार यांनी खंबीर पाठिंबा दिला असून, यावरून सत्ताधारी भाजप आणि संबंधित संघटनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील बदलत्या स्वरूपावर चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानाचे समर्थन करत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पवार साहेबांनी जे म्हटले आहे, ती खरी वस्तुस्थिती आज आहे. बाहेर राज्यातून येणारे काही जण संतांविरोधात बोलतात, पण प्रतिगामी विचारांचे लोक शांत बसतात. वारकरी संप्रदाय अन् तिथे असणारे सामान्य वारकरी हे अजूनपर्यंत तरी संतांच्या विचाराचे आहेत. पण त्या विचारांवर अतिक्रमण किंवा संक्रमण करण्याचा प्रयत्न प्रतिगामी किंवा मनुवाद पुढे घेऊन जाणाऱ्या विचाराचे लोक करत आहेत. संतांच्या विचारांवर अतिक्रमणाचा प्रयत्न रोहित पवार म्हणाले की, “संतांनी नेहमीच भेदभावाचा निषेध करून समतेची शिकवण दिली. मात्र, आज काही राजकीय पक्ष आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या प्रतिगामी संघटना वारकरी संप्रदायात संक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राबाहेरील काही नेते आणि तथाकथित गुरुवर्य येथे येऊन आपल्या संतांविरुद्ध बोलतात, पण हे प्रतिगामी लोक तेव्हा मूग गिळून गप्प बसतात. ज्यांनी वारकरी संप्रदायावर हल्ले केले आणि वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला, तेच लोक आज पवार साहेबांवर टीका करत आहेत. साहेबांनी मांडलेली भूमिका ही आजची वस्तुस्थिती आहे.” ‘ब्लॅक मॅजिक’ प्रकरणावरून भाजपवर संशय भोंदू अशोक खरात प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी धक्कादायक शंका उपस्थित केली. ते म्हणाले, “पुरोगामी महाराष्ट्रात जर काही नेते ‘ब्लॅक मॅजिक’ (जादूटोणा) करत असतील, तर त्यांची नावे समोर येणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू आहे आणि अनेक गोष्टी बाहेरही आल्या आहेत. मात्र, अद्याप काही बड्या नेत्यांची माहिती का दडवली जात आहे? त्या व्हिडिओंचा आणि पुराव्यांचा वापर भाजप राजकीय दबाव आणण्यासाठी किंवा नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी करत आहे का?” असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. राजकीय वातावरण तापले शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील ‘प्रतिगामी घुसखोरी’वर भाष्य केल्यामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे. वारकरी संप्रदायाचा वापर राजकीय स्वार्थासाठी आणि मनुवादी विचार पुढे नेण्यासाठी केला जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केल्यामुळे आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *