Headlines

शरद पवार गटाचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात- धर्मरावबाबा आत्राम:आमचा एकही खासदार फुटणार नाही,आत्रामांच्या दाव्यावर धैर्यशील मोहिते पाटलांचे प्रत्युत्तर




शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शरद पवार गटाचे 5 खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. ‘आम्ही कोणतेही ऑपरेशन करणार नाही, तर तुतारीवाले स्वतःहून विकासासोबत येतील,’ असा टोलाही त्यांनी लगावला. धर्मरावबाबा आत्राम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघातील कामे करण्यासाठी सत्तेसोबत आणि विकासासोबत राहणे गरजेचे असते. त्यामुळे शरद पवार गटाचे 5 खासदार येत्या 12 डिसेंबरपर्यंत आमच्या पक्षात प्रवेश करू शकतात. काँग्रेसच्या खासदारांना पक्षात आणण्याची सध्या कोणतीही चर्चा नाही, कारण त्यासाठी वेगळे ‘ऑपरेशन’ करावे लागेल.” तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास असून अनेक माजी खासदार आणि आमदार पक्षात येत असल्याने आमची ताकद वाढत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. अमित शहा यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यानच शरद पवार गटाच्या खासदारांना सोबत घेण्याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यामुळे आत्राम यांच्या दाव्याला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचे चोख प्रत्युत्तर दुसरीकडे, शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आत्राम यांचा दावा फेटाळून लावला आहे. इतर पक्षांमध्ये काय चालले आहे यावर मी बोलणार नाही, पण आमच्या पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो, असा विश्वास मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. हे ही वृत्त वाचा अशा नेत्यांमुळेच वीट आला असावा- कृष्णा पाटील आष्टीकर ठाकरे गटातून बंडखोरी करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आष्टीकर यांच्यावर केलेल्या अत्यंत तिखट टीकेला आता त्यांचे सुपुत्र आणि विधान परिषदेचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी आजही उद्धव ठाकरेंसोबतच खंबीरपणे उभा असून, माझ्या कुटुंबावर चिखलफेक करणाऱ्या सुषमा अंधारेंना उत्तर देण्यास मी अजिबात बांधील नाही,” अशा स्पष्ट शब्दांत कृष्णा आष्टीकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *