Headlines

शरद पवार स्कूलमध्ये धनुर्विद्येचा शुभारंभ:विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची नवी संधी; क्रीडा विभागात 18 देशी-विदेशी खेळांचे प्रशिक्षण‎




तालुक्यातील मानूर येथील श्री गुरुदत्त शिक्षण संस्थेच्या शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडा विभागात भारतीय प्राचीन कला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनुर्विद्या अर्थात तिरंदाजी या खेळाचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे त्यांना धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक डॉ. जे. डी. पवार यांनी केले. शाळेत विद्यार्थ्यांना १८ प्रकारच्या देशी व विदेशी खेळांचे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाते. त्यात आता धनुर्विद्येचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना उच्च शिक्षणासोबत एमपीएससी, यूपीएससी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अतिरिक्त गुणांचा लाभ मिळतो, असे डॉ. पवार यांनी सांगितले. धनुर्विद्या खेळाच्या शुभारंभप्रसंगी कळवण शहरातील प्रतिष्ठित उद्योगपती प्रकाश पाटील, जयंत पवार उपस्थित होते. संस्थेचे कार्यकारी संचालक व शाळेचे प्राचार्य बी. एन. शिंदे यांनी प्रास्ताविकात धनुर्विद्येचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील या खेळाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्राचार्य जे. एल. पटेल, उपप्राचार्य डॉ. अविनाश लांडगे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *