![]()
सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहरानजिक असलेल्या वेणेगाव येथे पाइपलाइनला लावलेला पॅच उडल्याने मोठी गळती लागली होती. शनिवार दि. १८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सोलापूर – पुणे महामार्गलगत
.
सदर जलवाहिनी फुटताच वेणेगाव ग्रामस्थांनी सोलापूर महानगर पालिकेच्या वेबसाईट वरून नंबर घेऊन फोन लावले परंतु फोनला प्रतिसाद मिळत नव्हता दुपारी एक वाजेपर्यंत ही गळती सुरू होती. ही गळती महामार्गाच्या लगतच असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. तर सदर पाइपलाइनची दुरुस्ती महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सायंकाळी साडेसहा वाजता वेल्डिंग करून पॅच जोडून पूर्ण केला व ७ वाजल्याचे नंतर पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. ^सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा पॅच निघाल्यामुळे गळती झाल्याचे नागरिकांनी फोन करून कळवळे ताबडतोब मोटारी बंद करून पाणी बंद केले . दुपारी काम सुरू करून सायंकाळी साडेसहा वाजता काम पूर्ण केले , रात्री मोटारी सुरू केल्या. एस. के. उत्सुर्गी, उप अभियंता नागेश क्षीरसागर, माजी सरपंच, वेणेगाव
पाणी गळती झाल्याचे समजताच महानगरपालिकेला संपर्क वेणेगावजवळ जलवाहिनीला गळती सुरु होताच आम्ही महापालिकेचे वेबसाईटवरून लॅंडलाईनवर फोन केला मात्र फोन कोणीही उचलला नाही शेवटी केबलची चारी खोदणारांना फोन लावायला लावला.
मनपा प्रशासनाची भूमिका