![]()
पालखी मार्गावरील मुक्काम, दुपारचा विसावा, रिंगण तळ आदी गर्दीच्या ठिकाणी असलेले अनधिकृत, स्ट्रक्चर ऑडिट नसलेले धोकादायक ठरतील असे होर्डिंग्ज हटवण्यात यावेत, असे आदेश असतानाही वाखरी पालखी तळालगत अतिशय गर्दी असते त्या ठिकाणी भव्य असे होर्डिंग अनधिकृत रि
.
पालखी मार्गावर पालखी तळ, रिंगण तळ, विसाव्याचे ठिकाण आदी गर्दीच्या परिसरात असलेले धोकादायक ठरतील असे होर्डिंग्ज हटवण्यात यावेत असे आदेश असलेले आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने १५ जुलै रोजी काढण्यात आलेले आहेत. त्यानुसार वाखरी ग्रामपंचायतीने अनेक अनधिकृत आणि धोकादायक ठरतील असे होर्डिंग्ज हटवले आहेत. मात्र वाखरी पालखी तळालगत पालखी मार्गाच्या जागेत, ज्या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी असते, अशा ठिकाणी सुमारे ३०० चौरस फूट आकाराचे भव्य होर्डिंग उभा करण्यात आलेले आहे. वाखरी ग्रामपंचायत प्रशासनाने हे होर्डिंग उभा करण्यास मनाई केली असता सत्ताधारी राजकीय पक्षाचे आणि स्थानिक नेत्याचे नाव सांगून, प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात आहे. . वाखरी येथील पालखी तळ अतिशय महत्त्वाचा असून २३ जुलै रोजी येथे सर्व मानाच्या प्रमुख पालख्यांसह इतरही असंख्य पालखी सोहळे मुक्कामी असतात. सुमारे ६ ते ८ लाख भाविक येथे मुक्कामी असतात. . दि. २३ आणि २४ जुलै रोजी प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी धोकादायक असा एकाच चौकोनी बेसवर भव्य होर्डिंग उभा केले आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन ते तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.