![]()
सरकारी रुग्णालयांतील अनागोंदी कारभार, औषधांचा कृत्रिम तुटवडा आणि रुग्णांची होणारी हेळसांड रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठा प्रशासकीय दणका दिला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) यांच्या बदल्या, पदोन्नती आणि प्रशासकीय भवितव्य आता केवळ सेवाज्येष्ठतेवर ठरणार नसून १०० गुणांच्या वार्षिक वस्तुनिष्ठ कामगिरीवर निश्चित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांत केवळ हजेरी नोंदवून शहरात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या विशेषज्ञ डॉक्टरांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी आता थेट सीएस आणि डीएचओ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अधिनस्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा थेट फटका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालातील (सीआर) गुणांकनावर बसेल. याशिवाय राज्य पातळीवरील पुरवठ्याअभावी होणाऱ्या ‘लोकल पर्चेस’मधील (स्थानिक खरेदी) गैरप्रकारांना चाप लावून, रुग्णालयात ‘शून्य तुटवडा’ ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनाच पूर्ण गुण दिले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. श्रेणीनुसार कारवाई आणि लॉबिंगला मिळेल ब्रेक
1. ‘अ’ श्रेणी (८०+ गुण) : मुंबई, पुणे, ठाण्यासारखे मोठे जिल्हे किंवा उपसंचालकपदाची धुरा.
2.‘ब’ श्रेणी (६० ते ७९ गुण) : मध्यम जिल्हे अथवा समकक्ष प्रशासकीय पदे.
3.‘क’ श्रेणी (४० ते ५९ गुण) : सुधारणेसाठी ६ महिन्यांची मुदत; तोपर्यंत बिगर-महत्त्वाची पदे.
4. ‘ड’ श्रेणी (४० पेक्षा कमी) : थेट साइड पोस्टिंग, पदोन्नतीला स्थगिती आणि वार्षिक वेतनवाढ रोखणार. अनेकांचे धाबे दणाणले ग्रामीण भागात डॉक्टर हजर नसणे, औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून बाहेरून औषधे आणायला लावणे यांसारख्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. यामुळे आता विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. खुर्ची अडवणाऱ्यांचे दिवस संपले केवळ सेवाज्येष्ठतेवर खुर्ची अडवून बसणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत. कामात पारदर्शकता, गुणवत्ता आणि प्रत्यक्ष रुग्णसेवा देणाऱ्या गुणवंत अधिकाऱ्यांनाच पुढील संधी व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. – प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री १०० गुणांची विभागणी
Source link
डॉक्टरांच्या बदल्या, पदोन्नत्या 100 गुणांच्या मूल्यांकनावर:केवळ ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणी मिळवणाऱ्यांनाच महत्त्वाच्या नियुक्त्या