![]()
शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून मुख्य चौक, बाजारपेठा, शाळा परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच मोठ्या संख्येने वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बरोबरीनेच शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची उणीव असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. शहरातील राजकमल चौक ऑटो स्टँड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इर्विन चौक, राजापेठ एसटी स्थानक, चित्रा चौक, बडनेरा रोड, गोपालनगर चौक सध्या वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहेत. या समस्येला सोडवण्यासाठी योग्य कारवाई करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, असे निवेदन अमरावती शहराचे पोलिस आयुक्त राकेश ओला यांना उपमहापौर सचिन भेंडे आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरसेवकांनी दिले. यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, नाना आमले, डॉ.मधुरा कहाळे, प्रीती रेवणे, प्रियंका पाटणे, महेश मुलचंदानी, योगेश विजयकर, नंदा सावदे, सुमती ढोके, किशोर जाधव, दीपक साहू, अर्चना पांडे, रजनी डोंगरे इत्यादी नगरसेवक उपस्थित होते.
Source link
शहरातील वाहतुकीच्या गंभीर समस्येवर उपाययोजना हव्यात, उपमहापौरांचे पोलिस आयुक्तांना निवेदन, कारवाईची मागणी