Headlines

अकोला-वाशीम जिल्ह्यातील 835 सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करू‎:जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांची माहिती‎




“सेवा सहकारी सोसायटी हा ग्रामीण सहकार व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील सर्व सेवा सहकारी सोसायट्या आर्थिक, तांत्रिक आणि प्रशासकीयदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत,’ असे प्रतिपादन अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांनी केले. रविवार, १० मे रोजी सेवा सहकारी सोसायटी, मनब्दा यांच्या नवीन सुसज्ज इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. काही सोसायट्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगत झाल्या असल्या तरी उर्वरित सर्व ८३५ सोसायट्यांचेही सर्वांगीण बळकटीकरण होणे काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.डॉ. कोरपे म्हणाले, “सोसायट्यांच्या बळकटीकरणातून शेतकरी, खातेदार आणि ग्रामीण भागाची आर्थिक उन्नती साधली जाईल आणि पर्यायाने सहकार क्षेत्र अधिक मजबूत बनेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल व्यवहार, पारदर्शक कारभार आणि शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा यामुळे सोसायट्यांची विश्वासार्हता अधिक वाढेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात सेवा सहकारी सोसायट्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नवीन इमारतीच्या माध्यमातून सोसायटीच्या कामकाजाला अधिक गती मिळणार आहे. शेतकरी व सभासदांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संचालक संदिप खारोडे यांनी केले. या कार्यक्रमास बँकेच्या माजी संचालिका रुपाली खारोडे, सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य अंबादास राऊत, दादाराव पाश्रीकर, शाळीग्राम पाश्रीकर, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष शेषराव पाश्रीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराचे माजी सभापती रमेश दारोकार, संचालक शांताराम काळे, दामोदर मार्के, रविंद्र बिहाडे, लखन राजनकर, अडगांव सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फाफट, खंडाळा सोसायटीचे अध्यक्ष गजानन वानखडे, मनब्दा सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र पाथ्रीकर, उपाध्यक्ष रामु राऊत, गजानन वाघोळे, मुन्ना पाथ्रीकर, शेषराव पोहरकर, शंकरराव ताथोड, पांडुरंग चिमणकर, ॲड. गजाननराव तराळे, खरेदी विक्री संस्थेचे संचालक पुंडलिकराव खारोडे, चंद्रकांत ताथोड, शरद आखरे, अरुण तेल्हारकर, राधेशाम भदे, पंकज आढे व परिसरातील इतर सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळ, कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाला नागरिक व सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिगांबर चिकटे यांनी केले तर आभार प्रमोद चांदुरकर यांनी केले. यावेळी अकोला व वाशीम जिल्हा प्राथमिक कृषी सहकारी पत संस्थोचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “सहकाराच्या निकोप वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे ही काळाची गरज आहे. सेवा सहकारी सोसायट्यांच्या मजबुतीकरणासाठी बँक सर्वतोपरी सहकार्य करत आहे. अत्यल्प व्याजदरात विविध कर्जसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सर्व सोसायट्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *