![]()
कारगिलच्या रणभूमीवर भारतीय जवानांनी केवळ शत्रूच्या चौक्या जिंकल्या नाहीत, तर त्यांनी भारताच्या स्वाभिमानाची उंची जगाला दाखवून दिली. शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे ही श्रद्धा आहे. मात्र त्यांनी जपलेल्या राष्ट्रासाठी प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि
.
आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा आणि यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या विद्यमाने करमाळ्याच्या यशकल्याणी सेवाभवनात २७ वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. देशसेवा, शिक्षण, साहित्य, सामाजिक आणि युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष पुरस्कारांनी गौरव केला.
प्रा.करे-पाटील म्हणाले, कारगिलचा इतिहास हिमालयाएवढ्या धैर्याचा, मातृभूमीवरील निष्ठेचा आणि मृत्यूलाही पराभूत करणाऱ्या सैनिकांच्या राष्ट्रप्रेमाचा अमर अध्याय आहे. सीमारेषेवर उभा असलेला जवान आपल्या सुरक्षित आयुष्याचा अदृश्य पहारेकरी आहे. त्यामुळे सैनिकांचा सन्मान एखाद्या दिवसापुरता मर्यादित न राहता तो समाजाच्या विचारांचा आणि नव्या पिढीच्या संस्कारांचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त भारत शिंदे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष अॅड. बाबूराव हिरडे, स्वातंत्र्यसैनिक परिवाराचे प्रतिनिधी विवेक येवले, सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले, इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड यांची मनोगत व्यक्त केले. या समारंभाच्या निमित्ताने कंदर येथील युवा निर्माण अकॅडमीला यशकल्याणी संस्थेकडून एक स्मार्ट टीव्ही प्रदान केला. या वेळी प्रवीण अवचर यांच्या वतीने देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. करमाळ्यात जीवन गौरवासह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.
करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, पत्रकार शीतलकुमार मोटे, गायक प्रवीण अवचर, रावगावच्या पंडित नेहरू विद्यालयाचे प्रताप बरडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, कारगिल युद्धातील सहभागी माजी सैनिक पांडुरंग साळवे, बाळासाहेब काकडे यांचा ‘कारगिल योद्धा’ म्हणून विशेष सन्मान केला. अभियंता हर्षद शिंदे, अभियंता अमृत महामुनी यांना विशेष युवा पुरस्कार तर गौरव पवार, शुभम वळेकर, संकेत गरड, अभिषेक करकुटे यांना ‘बेस्ट एनसीसी कॅडेट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.