![]()
‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, मंगलमूर्ती मोरयाऽऽ’च्या निनादात चांदवड पोलिस कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत एकूण ७२ गणेश मंडळांनी श्रीगणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना केली आहे. चांदवड स्टेशन हद्दीतील २४ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवून ग्रामऐक्याचा नारा दिला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा या उपक्रमात एका गावाचा सहभाग वाढला आहे. चांदवड पोलिस ठाणे व प्रशासनाच्या वतीने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेचे आवाहन करण्यात आले होते. त्यास ग्रामीण भागातील २४ गावांनी प्रतिसाद दिला आहे. चांदवड पोलिस ठाणे हद्दीतील ७२ गणेशमंडळांकडून नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जांना परवानगी देण्यात आली. चांदवड पोलिस कार्यालयाच्या कार्यकक्षेत १८ सार्वजनिक मोठे, ३० सार्वजनिक लहान व २४ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ अशा एकूण ७२ गणेश मंडळांनी श्री गणरायाची उत्साहात स्थापना केली आहे. चांदवड शहरातील लहान-मोठ्या अशा एकूण ३० मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. चांदवड शहरातील विविध गणेश मंडळांनी वाजतगाजत मिरवणुका काढून जल्लोषात श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. शहरातील आठवडे बाजार तळात गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी झाली होती. शहरातील अनेक मंडळांनी मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश उत्सव कालावधीत पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. या २४ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेंतर्गत चांदवड तालुक्यातील चांदवड पोलिस कार्यालय हद्दीतील दरेगाव (अष्टविनायक गणेश मंडळ), डोणगाव (शिवशती मित्रमंडळ), वाघदर्डी (श्रीगणेश मित्रमंडळ), रायपूर (अचानक गणेश मित्रमंडळ), मेसनखेडे खु. (दत्ताचे शिंगवे) युवा गणेश मित्रमंडळ, वडगाव पंगू (मोरया मित्रमंडळ), पिंपळगाव धाबळी (मोरया बॉईज गणेश मंडळ), उसवाड (स्वराज्य मित्रमंडळ), न्हनावे (अष्टविनायक मित्रमंडळ), गंगावे (सावता गणेश मित्रमंडळ), डोंगरगाव (श्री वरदविनायक गणेश मंडळ), पन्हाळे (विघ्नहर्ता मित्र मंडळ), तळवाडे (शिवगर्जना मित्र मंडळ), शिवाजीनगर, मंगरुळ (मोरया मित्रमंडळ), बोपाणे (अष्टविनायक गणेश मित्रमंडळ), भरवीर (ईच्छापूर्ती गणेश मित्र मंडळ), वडाचा मळा परसूल (श्री गणेश मित्रमंडळ), आडगाव (शिलावट वस्ती गणेश मित्रमंडळ), वाहेगावसाळ (मोरया फ्रेंड सर्कल), रेडगाव खुर्द (गणराज मित्रमंडळ), दिघवद (श्री गणेश मित्रमंडळ), वाकी बु. (शिवतांडव युवा प्रतिष्ठाण), कोलटेक (वक्रतुंड मित्र मंडळ), काळखोडे (एक गाव एक गणपती मित्र मंडळ) या २४ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
Source link
चांदवड तालुक्यातील 24 गावांत ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना:गणेशोत्सव चांदवड पोलिस ठाणे हद्दीत 72 गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना